खामगाव जालना रेल्वे मार्गासाठी खासदार प्रतापराव जाधव यांनी लोकसभेत उपस्थित केला प्रश्न.. रेल्वेमार्गाचे काम त्वरेने करण्याची रेल्वे मंत्र्यांकडे केली मागणी…

0
40

खामगाव जालना रेल्वे मार्गासाठी खासदार प्रतापराव जाधव यांनी लोकसभेत उपस्थित केला प्रश्न.. रेल्वेमार्गाचे काम त्वरेने करण्याची रेल्वे मंत्र्यांकडे केली मागणी…

बुलडाणा(प्रतिनिधी)
खामगाव जालना रेल्वे मार्गाच्या कामाला तात्काळ मंजुरात देऊन या रेल्वेमार्गाचं काम त्वरेने करावे अशी आग्रही मागणी बुलढाणा लोकसभा मतदारसंघाचे खासदार प्रतापराव जाधव यांनी आज लोकसभेत प्रश्न उपस्थित करून रेल्वेमंत्री यांच्याकडे केली आहे
बुलढाणा जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा ठरणारा व इंग्रज काळापासून प्रलंबित असलेला जालना खामगाव रेल्वे मार्ग साठी मंजुरात मिळाली आहे त्यासंदर्भातील डी पी आर तयार करण्यात आला आहे आणि पुंजी निवेश कार्यक्रमांतर्गत राज्य सरकारने 50% भागीदारी देण्याचं पत्रही केंद्र सरकारला दिलाय त्या संदर्भात 29 एप्रिल 2023 ला एक बैठक झाली होती त्या बैठकीमध्ये या संदर्भात काही सूचना केल्या होत्या त्यातील काहींची पूर्तता ही झाली आहे त्यामुळे या रेल्वे मार्गाला मंजूर देऊन रेल्वेमार्गाचे काम तात्काळ सुरू करावं अशी मागणी खासदार प्रतापराव जाधव यांनी नियम 377 ला अधीन राहून आज सहा डिसेंबरला लोकसभेमध्ये प्रश्न उपस्थित करून रेल्वेमंत्री यांच्याकडे केली आहे हा रेल्वे मार्ग झाल्यामुळे मराठवाडा विदर्भ हे दोन प्रांत जोडल्या जाणार असून जिल्ह्याच्या औद्योगिक क्षेत्राला चालला देणारा रेल्वेमार्ग ठरणार आहे तेव्हा तात्काळ मंजुरात देऊन कामाला सुरुवात करावी अशी आग्रही मागणी ही त्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांमध्ये केली आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here