शिवजयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी आमदार संजय गायकवाड यांची निवड…. यावर्षीची शिवजयंती गिनीज बुकमध्ये नोंद होईल अशी साजरी करू नवनियुक्त अध्यक्षांनी केली भावना व्यक्त..*

0
147

शिवजयंती उत्सव अध्यक्षपदी आमदार संजय गायकवाड यांची निवड….

बुलडाणा ( प्रतिनिधी ) हिंदवी
स्वराज्याचे संस्थापक राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती यावर्षी बुलडाण्यात मोठ्या उत्साहात साजरी होणार असून यावर्षीच्या सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीचीच्या अध्यक्षपदी आमदार संजय गायकवाड यांची एकमताने निवड करण्यात आली आहे … बुलढाणा येथील शिवजयंती उत्सव हा लोकउत्सव म्हणुन सर्व जाती धर्माच्या लोकांच्यावतीने साजरा केला जातो. यावर्षाच्या सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्या नवीन समिती अध्यक्षांची निवडण्यासाठी 30 डिसेंबरला बुलढाणा येथील विश्रामगृहावर एका बैठकीचे आयोजन करण्यात आलं होतं या बैठकीला सार्वजनिक उत्सव समितीचे माजी अध्यक्ष व बुलढाणा शहरातील शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते 19 फेब्रुवारीला हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात येणार आहे … बुलढाणा येथे साजरी होणाऱ्या जयंतीला यावर्षी विशेष महत्त्व आहे. कारण छत्रपती शिवाजी महाराजांचा सर्वात मोठा अश्वारूढ पुतळा बुलढाणा शहरातील संगम चौक स्थित असलेल्या शिवस्मारकामध्ये स्थापित करण्यात आला आहे. जानेवारी महिन्यात या स्मारकाचं लोकार्पण होणार आहे… या पार्श्वभूमीवर यावर्षीची शिवजयंती मोठ्या थाटामाटात साजरी केल्या जाणार असून विविध कार्यक्रमांचाही आयोजन केल्या जाणार आहे.. यावर्षी शिवजयंती उत्सवाचा आवाका पाहता … जयंतीचा शिवधणुष्प पेलवण्याची क्षमता असल्यांनीच पुढ याव सांगण्यात आलं. त्यावेळी शेळके पुढे आले आणि त्यांनी बुलढाण्याचे लोकप्रिय आमदार संजय गायकवाड यांना यावर्षीचा शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्षपद द्याव असं मत व्यक्त केलं त्यावेळी उपस्थित शिवप्रेमींनी त्यांना टाळ्यांचा प्रतिसाद देऊन त्यांच्या मागणीला दुजोरा दिला व आमदार संजय गायकवाड यांची शिवजयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी एकमुखाने निवड करण्यात आली..यावेळी उपस्थित शिवप्रेमींना मार्गदर्शन करताना आमदार संजय गायकवाड म्हणाले की महाराजांची जयंती यावेळी आगळ्यावेगळ्या पद्धतीने आणि न भूतो न भविष्य अशा पद्धतीने साजरी करायची आहे… की या जयंती उत्सवाची नोंद गिणीज बुक ऑफ रेकार्ड मध्ये झाली पाहीजे ..शिवाजी महाराजांची महती सांगणारा *जाणता राजा* हा महानाट्याचा कार्यक्रम बुलढाण्यात घेणार येणार असल्याचं त्यांनी यावेळी जाहीर केलं या बैठकीला बुलढाणा शहरातील तमाम शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here