विरोधी पक्ष नेते अंबादास दानवेच्या जनता दरबाराला बुलडाण्यात सुरुवात .

0
325

विरोधी पक्ष नेते अंबादास दानवेच्या जनता दरबाराला बुलडाण्यात सुरुवात

  1. जनतेच्या समस्यांचा प्रश्न मार्गी लावण्याच्या दृष्टिकोनातून आणि ऑन द स्पॉट निपटारा करण्यासाठी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी बुलढाण्यात जनाधिकार जनता दरबार घेत आहे आहेत …
    जनतेच्या न्यायालयात शिव सेना उबाठा गटाची महापत्रकार परिषद झाल्यानंतर आज बुलढाण्यातुन  जनाधिकार म्हणजेच जनता दरबार कार्यक्रमाचा शुभारंभ विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी सुरू केलाय. राज्यात ठिकठिकाणी जनता दरबार घेऊन जनतेचे प्रश्न जनतेच्या दरबारात सोडवण्यात येणार आहे अशी माहिती विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली..
    बुलढाणा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या शेतकरी भवन येथे आज 17 जानेवारीला सकाळी 11 वाजता विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे उपस्थितीत जनाधिकार म्हणजे जनता दरबाराला सुरुवात झाली आहे शेतकरी शेतमजूर व विविध विषयांवर च्या समस्या जाणून घेऊन त्या समस्या ऑन द स्पॉट सोडवण्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी संबंधितविभागाशी दूरध्वनी म्हणून संपर्क साधून जनतेच्या समस्या संबंधित अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचल्या आणि त्यांचे काम तात्काळ करण्याचे निर्देशित दिले यावेळी उबाठा शिवसेना गटाचे जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत उपस्थित होते …

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here