. शेतकरी नेते रविकांत तुपकर भूमिगत ….पोलीस घेतांय त्यांचा शोध
- बुलडाणा (प्रतिनिधी) सोयाबीन कापूस शेतकऱ्यांच्या न्याय मागण्यासाठी गुजरातमध्ये जाणाऱ्या रेल्वे रोखण्याचा इशारा शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी दिला आहे पोलीस आपणास ताब्यात घेऊ शकते याचा अंदाज आल्याने ते भूमिगत झाले आहेत रेल्वे रोको आंदोलनावर आपण ठाम असल्याचे त्यांनी दाखवून दिलय शेतकरी शेतमजूर तरुणांच्या न्याय हक्कासाठी दुष्काळाची मदत मिळावी पीक विमा नुकसान भरपाई द्यावी व सोयाबीन कापसाला भाव द्यावा या मागणीसाठी गेल्या अनेक दिवसांपासून आंदोलन करत आहे त्या संदर्भात त्यांची शासनासोबत चर्चाही झाले परंतु अद्याप पर्यंत कोणतीही कारवाई झाली आहे त्यामुळे राज्यातील सरकारच रिमोट कनेक्शन ओळखुन गुजरातमध्ये जाणारी रेल्वे रोखण्याचा इशारा त्यांनी दिला आहे 19 जानेवारीला मलकापूर येथील रेल्वे स्थानकावर हे आंदोलन ते करणार आहे आंदोलनापूर्वीच आपणास पोलीस ताब्यात घेऊ शकतात याची पूर्वकल्पना त्यांना आल्यामुळे ते भूमिगत झाले आहे गेल्या वेळेसही शेतकरी आंदोलनामध्ये पोलिसांना चकमा देत पोलिसांच्याच वेशभूषेमध्ये रविकांत तुपकर आंदोलनात सहभागी झाले होते..