मराठा बांधवांनो आता तरी खरे झारितले शुक्राचार्य ओळखा … आमदार आकाश फुंडकर

0
59

मराठा बांधवांनो आता तरी खरे झारितले शुक्राचार्य ओळखा … आमदार आकाश फुंडकर

बुलडाणा ( प्रतिनिधी ) मनोज जरांगे पाटील यांच्या सर्व मागण्या मान्य करण्यात आल्या असून उपोषणाचा तिढा अखेर सुटला आहे. सुधारित अध्यादेश सरकारकडून मनोज जरांगे पाटील यांच्याकडे सूपूर्द करण्यात आला आहे. मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाला मोठं यश आलं आहे. राज्य सरकारच्या शिष्टमंडळानं रात्री उशिरा मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. मनोज जरागेंच्या मागण्याही मान्य करण्यात आल्या आहेत. यावरुन आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत.

खामगावचे भाजपाचे आमदार ॲड आकाश फुंडकर यांनीं यावर बोलतांना म्हणाले की हा खूप आनंदाचा क्षण आहे सर्व मराठा बांधवांचे मी अभिनंदन करतो विशेष करून मुख्यमंत्री श्री एकनाथराव शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि अजित दादा आणि आपले मराठा बांधव यामध्ये एक संघर्ष सुरू झाला होता पण याच्यात आज मार्ग निघालेला आहे. आणि येणाऱ्या काळात हे आरक्षण पक्क्या स्थितीत सगळ्यांना मिळेल सगळ्यांच्या समस्या दूर होतील. आरक्षण टिकवण्यासाठीच हे महायुतीच सरकार इथे बसलेला आहे म्हणून जरांगे पाटलांनी जे ज्या मागण्या केलेल्या त्या सर्व मागण्या हे पूर्ण करण्यासाठी सरकार कटीबद्ध आहे. जे विरोधक आहेत हे महाविकास आघाडी सरकार असताना याच विरोधकांनी हे आरक्षण गमवलं होतं. मी सर्व मराठा बांधवांना हीच अपील करणार आहे की आता तरी खरे झारितले शुक्राचार्य ओळखा ज्यांना मराठा आरक्षण मुळातच मिळू द्यायचं नव्हतं असा आरोप खामगाव विधासभा मतदार संघाचे आमदार आमदार ॲड आकाश फुंडकर यांनी केलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here