केंद्र सरकारच्या कृषी धोरणाला विरोध करत चिखली येथे शिवसेनेने केला रास्ता रोको
Buldhana date
केंद्र सरकारचा कृषी सुधारणा कायदा हा शेतकरी विरोधी असल्याचा आरोप करत आज 8 डिसेंबरला विविध शेतकरी संघटनांनी भारत बंदची हाक दिली होती या आंदोलनामध्ये शिवसेनेने सुद्धा जाहीर पाठिंबा दर्शविला होता त्यानुसार बुलढाणा जिल्ह्यातील चिखली येथे शिवसैनिकांनी रास्ता रोको आंदोलन करून केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली
कृषी सुधार कायदा शेतकरी विरोधी निर्णयाने शेतकऱ्यावर झालेल्या अन्यायाविरोधात आज 8 डिसे रोजी शिवसेना चिखली विधानसभेचे भारत बंदला समर्थन दिले. शिवसेना जिल्हा प्रमुख जालिंधर बुधवत यांच्या नेतृत्वात तसेच सहसंपर्क प्रमुख प्रा.श्री.नरेंद्र खेडेकर, श्री भास्करराव मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत शेलुद येथे रास्ता रोको करून केंद्र सरकार विरोधात घोषणा देण्यात आल्या. शेतकऱ्यांच्या समर्थनात रस्त्यातच ठेचा भाकर चे जेवण करण्यात आले.
यावेळी उप जि प्रमुख उप जि प्र शिवाजीराव देशमुख, तालुका प्रमुख कपिल खेडेकर, लखन गाडेकर, शहर प्रमुख श्रीराम झोरे, युवा सेना ता प्र नंदू कऱ्हाडे, शहर संघटक प्रीतम गैची, विलास घोलप यांच्यासह शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते या आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने उपस्थित होते.