स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी रेल्वे रोको आंदोलन करून केली भारत बंद ला सुरुवात*

0
63

*स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी रेल्वे रोको आंदोलन करून केली भारत बंद ला सुरुवात*

  • मलकापूर {प्रतिनिधी}

केंद्र सरकारने आणलेल्या कृषी धोरणाच्या विरोधात पुकारण्यात आलेल्या देशव्यापी बंदला बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी रेल्वे रोको आंदोलन करून सुरुवात केली आहे

केंद्र शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणांच्या विरोधात देशपातळीवर विविध शेतकरी संघटनांचे गेल्या 12 दिवसापासून दिल्लीच्या सीमेवर लाखो शेतकऱ्यांसह तीव्र आंदोलन सुरू आहे. तीनही कृषी सुधारणा कायदे मागे घ्या, शेतमालास किमान आधारभूत मूल्य लागू असलेला कायदा करा आदी रास्त मागण्यासाठी हे आंदोलन उभारले आहे. देशातील सर्व शेतकरी संघटनांनी दिनांक 8 डिसेंबर 20 मंगळवार रोजी भारत बंद चे आवाहन केले आहे. या भारत बंदला बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात स्वाभिमानी शेतकरी आक्रमक कार्यकर्त्यांनी मलकापूर रेल्वे स्थानकावर मद्रास-अहमदाबाद सुपरफास्ट एक्सप्रेस अडवून रेल रोको आंदोलन केले यावेळी केंद्र सरकारच्या कृषी धोरणाच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केली या आंदोलनामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी सदस्य सहभागी झाले होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here