भारत निवडणूक आयोगाने घोषीत केलेल्या कार्यक्रमानुसार दि. 20 नोव्हेबर 2024 रोजी मतदान होणार आहे. लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी सर्व मतदारांनी मतदानाच्या दिवशी मतदान करावे. यासाठी मतदारांनी आपले नाव मतदार यादीत असल्याची खात्री करुन घ्यावी. मतदार केंद्र जाणून घेण्यासाठी व्होटर हेल्पलाईन ॲप किंवा voters.eci.gov.in या संकेतस्थळाचा वापर करावा. तसेच मतदार नोंदणी किंवा मतदान केंद्राची माहिती शोधण्याच्या बाबतीत काही मदत हवी असल्यास 1950 या टोल फ्री क्रमांक किंवा जळगाव जामोद मतदारसंघासाठी हेल्प लाईन क्रमांक 18002336365 वर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे