मानधन बिल काढण्यासाठी 3 हजार रुपयाची लाच स्वीकारताना मोताळा कोषागार कार्यालयातील अधिकारी जेरबंद

0
532

मानधन बिल काढण्यासाठी 3 हजार रुपयाची लाच स्वीकारताना मोताळा कोषागार कार्यालयातील अधिकारी जेरबंद

मोताळा (प्रतिनिधी )

मानधन बिल काढण्यासाठी 3 हजार रुपयाची लाच स्वीकारताना मोताळा कोषागार कार्यालयातील उपकोषागार अधिकाऱ्याला लाचलुचपत विभागाच्या विभागाने जेरबंद केले आहे

मलकापूर येथील 47 वर्षीय इसमाला त्यांच्या मानधनाची बिल काढण्यासाठी मोताळा कोषागार कार्यालयातील उपकोषागार अधिकारी प्रमोद मोहोड यांनी सहा हजार रुपये मागितले होते त्यातील तीन हजार रुपये आठ नोव्हेंबरला पंचा समक्ष स्वीकारताना लाचलुचपत विभागाच्या पथकाने त्यांना जेरबंद केले सदरहू कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची बुलढाणा अप्पर पोलीस अधीक्षक श्री पडघन तपास अधिकारी श्रीकांत निचळ पोलीस शिपाई विलास साखरे जगदीश पवार विनोद लोखंडे यांच्या पथकाने केली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here