५ पिस्टल व १५ काडतुसांसह एकास अटक : 

0
50

५ पिस्टल व १५ काडतुसांसह एकास अटक :

बुलढाणा प्रतिनिधी
: मध्यप्रदेशातून पिस्टल आणि काडतुसांची विक्री करण्यासाठी काही इसम बुलढाणा जिल्ह्याच्या जळगाव जामोद शहरात येत असलायची माहिती बुलडाणा स्थानिक गुन्हे शाखेला मिळाल्यावरून आज सायंकाळी लावलेल्या सापळ्यात ५ पिस्टल आणि १५ जिवंत काडतुसांसह एक जण जाळ्यात अडकला असून एक जण अंधाराचा फायदा घेत पळून जाण्यात यशस्वी झाला आहे.

: बुलढाणा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला जळगांव जामोद हद्दीत पेट्रोलींग करीत असतांना गोपनिय बातमीदाराकडुन बातमी मिळाली की, काही ईसम अवैध देशी पिस्टल च्या विक्री करीता घेवुन येत आहे. अशी बातमी मिळाल्यावरुन बऱ्हाणपुर चौक पोलीस स्टेशन जळगांव जामोद येथे नाकाबंदी केली असतांना दोन अनोळखी ईसम मध्यप्रदेश मधुन दुचाकीने येतांना दिसले. ती दुचाकी पोलीस स्टाफचे मदतीने थांबविण्याचा प्रयत्न केला असता त्यातील एक ईसम पकडण्यात आला. एक ईसम अंधाराचा फायदा घेवुन जगंलाच्या दिशेने पळुन गेला. पकडलेल्या ईसमांस नाव गांव विचारले त्याने त्याचे नाव भोरु भुवानसिंग रावत वय २५ वर्ष रा. शेकापुर ता. खकनार जि. ब-हाणपुर मध्ये प्रदेश असे सांगतले आहे. यावेळी आरोपीची झडती घेतलं;इ असता पाच देशी बनावटीचे पिस्टल मॅगझिनसह एकुण किंमत. २,५०,०००/- रु. १५ जिवंत काडतुसे एकुण किंमत. ७,५००/- रु. एक दुचाकी किंमत.५०,०००/- रु. एक सँमसंग दोन सिम असलेला मोबाईल किंमत. ५०००/- रु.नगदी १९४०/- रु. असा एकुण ३,१४,४४०/ रु. मुददेमाल जप्त करुन आरोपींवर शस्त्र अधिनियम कलम ३/२५ प्रमाणे कार्यवाही कामी पोलीस स्टेशन जळगांव जामोद यांचे ताब्यात देण्यात आले आहे. फरार आरोपीचा शोध पोलीस घेत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here