*शहिद प्रदीप मांदळे यांच्या नियोजित स्मारकाच्या जागेची पालकमंत्री डॉ राजेद्र शिगणे यांनी केली पाहणी*
सिंदखेडराजा : मातृतीर्थ सिंदखेडराजा तालुक्यातील पळसखेड चक्का येथील शहीद जवान प्रदीप मांदळे यांनी आपले जीवन भारत मातेसाठी अर्पण केले. त्यांचं गावात स्मारक व्हावं अशी गावकऱ्यांची इच्छा असून त्यासाठी लागणाऱ्या जागेची पाहणी पालकमंत्री मा ना डॉ राजेंद्रजी शिंगणेसाहेब यांनी केली. यावेळी संबंधित यंत्रणेला सदर जागेवर स्मारकासाठी आवश्यक ती कार्यवाही लवकरात लवकर करण्याच्या सूचना दिल्या.
भारत मातेची सेवा करत असतांना जम्मू काश्मीर खोऱ्यामध्ये द्रास सेक्टर मध्ये कर्तव्यावर असतांना 15 डिसेंबर रोजी अंगावर बर्फाचा ढीग पडून प्रदीप मांदळे हा जवान शहीद झाला आहे. याबाबतची माहिती कळताच जिल्ह्याचे पालकमंत्री मा ना डॉ राजेंद्रजी शिंगणेसाहेब यांनी त्यांच्या राहत्या गावी पळसखेड चक्का येथे त्यांच्या कुटुंबाची सांत्वनपर भेट घेऊन शोक व्यक्त केला. यावेळी प्रदीप मांदळे यांचा फोटो बघताच पालकमंत्री यांच्या डोळ्यात अश्रू आले.
पळसखेड चक्का मधील प्रदीप मांदळे हे 2008 साली औरंगाबादला घेण्यात आलेल्या भरतीमध्ये महार रेजिमेंट मधून देशसेवा करण्यासाठी भरती झाले होते. घरची परिस्थिती अत्यंत हालाखीची होती. साहेबराव मांदळे यांच्या निधनानंतर संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी प्रदिप यांच्यावर आली होती. अशा परिस्थितीत देखील त्यांनी देशसेवेसाठी सैन्यात भरती होण्याचा निर्णय घेतला. लहान भाऊ विशाल हादेखील सैन्यामध्ये कार्यरत आहे. तर दुसरा भाऊ संदीप हा कृषी सहाय्यक आहे.
- शहीद जवान प्रदीप मांदळे यांचे भाऊ म्हणाले की प्रदीप मांदळे हा अत्यंत चांगल्या स्वभावाचा व घराला पुढे नेणारा होता. शहीद प्रदिप मांदळे यांचे पार्थिव शरीर दिनांक 20 डिसेंबरला त्यांच्या राहत्या गावी पळसखेड चक्का येथे साडेदहा वाजता येणार असल्याचे त्यांनी सांगितले.