बुलडाणा जिल्हयातील पळसखेडचक्काचे जवान प्रदीप साहेबराव मांदळे यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार*..

0
147
  • **बुलडाणा जिल्हयातील पळसखेडचक्काचे जवान प्रदीप साहेबराव मांदळे यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार*…

बुलडाणा जिल्हयातील सिंदखेडराजा तालुक्यातील पळसखेडचक्का येथील महार रेजिमेंटचे जवान प्रदीप साहेबराव मांदळे हे काश्मीर मध्ये आपले कर्तव्य बजावताना असतांना द्रास टायगर हिल भागात अंगावर बर्फाचा ढीग पडून त्यांना वीरमरण आले. त्यांच्यावर आज त्यांच्या मूळ गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले

वीर जवान प्रदीप मांदळे यांना विरमरण झाल्याची माहिती बुलडाणा जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाला 15 डिसेंबरला रात्री कळविण्यात आली होती खराब हवामानामुळे त्याचे प्रार्थीव आणण्यात अडचण आली होती आज 20 डिसेबर रोजी वीरजवान प्रदीप मांदळे याच प्रार्थीव त्याचे मुळगाव असलेल्या पळ्सखेड चक्क येथे आणण्यातआले त्यांच्या राहत्या घरी पार्थिव ठेवण्यात आले त्यानंतर घरापासुन अंत्ययात्रा काढण्यात आली भारत माता की जय … अमर रहे अमर रहे शहिद जवान प्रदिप मांदळे अमर रहे ….वंदे मातरम अशा घोषणा देण्यात आल्या पालकमंत्री डॉ राजेद्र शिगंणे खासदार प्रतापराव जाधव जिल्हाधिकारी एस रामामूती यांनी पुष्पचक्र वाहुंन आंदरांजली वाहीली बी एस ए एफ च्यावतीने मानवंदना देण्यात आली त्यानंतर वीरजवान प्रदिप मांदळे यांना त्याचा पाच वर्षाचा मुलगा जयदिप मांदळे यांनी मुखअग्नी दिली या वेळी शोकाकुळ वातावरण निर्माण झाले होते

शहीद प्रदीप मांदळे यांचे वडील साहेबराव मांदळे यांनी मोलमजुरी करून मोठा पुत्र प्रदीप, संदीप व सैन्यातच कार्यरत आहे त्यातील प्रदीप 2008-09 मध्ये लष्करात भरती होऊन महार रेजिमेंटमध्ये दाखल झाला जवान प्रदीप मांदळे हे गत ऑगस्ट महिन्यात 15 दिवसांच्या सुटीवर गावी आले होते. त्यांनी आपल्या कुटुंबासह ती अल्प सुटी घालविली. मात्र ती भेट शेवटची ठरेल अशी कुणी कल्पनाही केली नसेल, पण दुर्दैवाने ती अखेरचीच भेट ठरली जवान प्रदीप यांच्या पश्चात पत्नी कांचन मुलगा सुरज, सार्थक, जयदीप हे मुले आहेत

[contact-form][contact-field label=”Name” type=”name” required=”true” /][contact-field label=”Email” type=”email” required=”true” /][contact-field label=”Website” type=”url” /][contact-field label=”Message” type=”textarea” /][/contact-form]

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here