कोरोना अलर्ट : प्राप्त 648 कोरोना अहवाल ‘निगेटिव्ह’; तर 69 पॉझिटिव्ह* •

0
90

*कोरोना अलर्ट : प्राप्त 648 कोरोना अहवाल ‘निगेटिव्ह’; तर 69 पॉझिटिव्ह* • 17 रूग्णांना मिळाली सुट्टी
बुलडाणा,(जिमाका) दि.3 : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 717 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 648 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 17 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 63 व रॅपीड अँटीजेन टेस्टमधील 6 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 581 तर रॅपिड टेस्टमधील 67 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 648 अहवाल निगेटीव्ह आहेत.
पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे : बुलडाणा शहर : 5, खामगांव शहर : 13, खामगांव तालुका : पारखेड 1, गोंधनपूर 1, चिखली शहर : 8, चिखली तालुका : वळती 2, कोलाबा 1, मंगरूळ 1, गोद्री 5, खंडाळा 1, चंदनपूर 1, ईसोली 1, दे. राजा शहर : 3, मोताळा तालुका: बोराखेडी 1, टाकळी 1, पिंपळगाव देवी 2, जळगाव जामोद शहर: 2, सिं. राजा तालुका: सावखेड तेजन 3, वडाळी 2, संग्रामपूर तालुका: सावळी 1, खिरेडा 2, टुनकी 1, शेगांव तालुका: गव्हाण 1, जवळा 2, शेगांव शहर: 2, मलकापूर शहर: 4 संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आल्या आहेत. अशाप्रकारे जिल्ह्यात आज 69 नवीन रूग्ण आढळले आहे.
तसेच आज 17 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे.
विविध तालुक्यातील कोविड केअर सेंटर नुसार सुट्टी देण्यात आलेले रूग्ण पुढीलप्रमाणे : खामगांव : 7, चिखली : 1, बुलडाणा : अपंग विद्यालय 1, शेगांव : 2, नांदुरा : 1, दे. राजा : 2, जळगांव जामोद: 2, मलकापूर: 1.
तसेच आजपर्यंत 91332 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 12232 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 12232 आहे.
तसेच 878 स्वॅब नमुने कोविड चाचणीसाठी घेण्यात आले आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 91332 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 12679 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 12232 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या रूग्णालयात 295 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 152 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here