बुलडाणा कोरोना अलर्ट : प्राप्त 456 कोरोना अहवाल ‘निगेटिव्ह’; तर 46 पॉझिटिव्ह*

0
75

*कोरोना अलर्ट : प्राप्त 456 कोरोना अहवाल ‘निगेटिव्ह’; तर 46 पॉझिटिव्ह*
• 19 रूग्णांना मिळाली सुट्टी
बुलडाणा,(जिमाका) दि. 4 : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 502 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 456 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 46 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 39 रॅपीड अँटीजेन टेस्टमधील 7 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 409 तर रॅपिड टेस्टमधील 47 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 456 अहवाल निगेटीव्ह आहेत.
पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे : खामगांव शहर : 7, खामगांव तालुका : हिवरा बु 1, बुलडाणा शहर : 11, बुलडाणा तालुका : येळगांव 1, पोखरी 1, मलकापूर शहर : 1, दे. राजा शहर : 6, चिखली शहर : 1, चिखली तालुका : खंडाळा 1, देऊळगांव मुंढे 1, टाकरखेड 1, मेंडगांव 1, मोताळा शहर : 1, मोताळा तालुका : पिं. देवी 2, सिं. राजा तालुका: दे. कोळ 1, शेगांव तालुका : जवळा 2, पाळोदी 1, शेगांव शहर : 3, मेहकर तालुका : कल्याणा 1, जळगांव जामोद शहर : 1, संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आल्या आहेत. अशाप्रकारे जिल्ह्यात 46 रूग्ण आढळले आहे.
तसेच आज 19 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे.
विविध तालुक्यातील कोविड केअर सेंटर नुसार सुट्टी देण्यात आलेले रूग्ण पुढीलप्रमाणे : बुलडाणा : आयुर्वेद महाविद्यालय 1, दे. राजा : 7, खामगांव : 3, नांदुरा : 2, चिखली : 3, मेहकर : 1, शेगांव : 2.
तसेच आजपर्यंत 91788 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 12251 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 12251 आहे.
तसेच 535 स्वॅब नमुने कोविड चाचणीसाठी घेण्यात आले आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 91788 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 12725 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 12251 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या रूग्णालयात 322 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 152 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.
******

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here