माँडेल डिग्री कॉलेजमध्ये सावित्रीबाई फुले जयंती साजरी
बुलडाणा (प्रतिनिधी)
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावती अंतर्गत मॉडेल डिग्री कॉलेज बुलढाणा येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरी करण्यात आली. सदर कार्यक्रम हा ऑनलाईन व ऑफलाईन दोन्ही पद्धतीने साजरा करण्यात आला. महाविद्यालयाचे मानद संचालक डॉक्टर केदार ठोसर यांनी ऑनलाईन पद्धतीने कार्यक्रमास उपस्थित राहून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले तसेच महाविद्यालयातील काही विद्यार्थ्यांनी ऑनलाइनच्या माध्यमातून कार्यक्रमास सहभाग नोंदविला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राध्यापक डॉक्टर मनोज डांगे यांनी सावित्रीबाई फुले यांच्या कार्याची माहिती देऊन आज स्त्री शिक्षणामध्ये ची भरारी घेत आहे त्याचे एकमेव श्रेय क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना आहे. कार्यक्रमाला प्रमुख उपस्थित प्राध्यापक डी पी माने, प्राध्यापक अभिजीत वडाळकर, प्राध्यापक देशपांडे,प्राध्यापक मुरलीधर जाधव, प्राध्यापक फासे प्राध्यापक वावगे सर, मंगेश जोशी व विद्यार्थी उपस्थित होते