30 गुन्ह्यातील सराईत आरोपी बुलडाणा पोलिसांच्या ताब्यात…

0
115

30 गुन्ह्यातील सराईत आरोपी बुलडाणा पोलिसांच्या ताब्यात…

बुलडाणा:- चोरी- घरफोडीच्या औरंगाबाद, जालना, नांदेड येथे विविध पोलिस ठाण्यात तब्बल जवळपास 30 गुन्हे गुन्ह्यातील सराईत असलेल्या आरोपीला बुलडाण्यात झालेल्या घरफोडी,चोऱ्याच्या चौकशीसाठी बीड जिल्ह्यातील गेवराई पोलिसांकडून बुलडाणा शहर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.सदर आरोपीचा नाव दिपकसिंग प्रल्हादसिंग टाक वय 22 वर्ष असे असून तो जालना येथील रहवासी आहे.

बीड जिल्ह्यातील गेवराई पोलीसांनी सराईत असलेल्या जालना येथील सराईत आरोपी दिपकसिंग प्रल्हादसिंग टाक याला गेवराई मध्ये घरफोडी व चोरीच्या गुन्ह्यात अटक केले होते.चौकशी दरम्यान त्याने औरंगाबाद, जालना, नांदेड यासह विविध पोलिस ठाण्यात घरफोडी,चोरीच्या जवळपास तब्बल 25 ते 30 गुन्हे दाखल आहे.गेवराई पोलिसांच्या चौकशी दरम्यान दिपकसिंग प्रल्हादसिंग टाक याने बुलडाणा शहरात घरफोडी व चोरी केल्याचा व प्रयत्न केल्याचा सांगितले आहे.याची माहिती गेवराई पोलिसांनी बुलडाणा शहर पोलिसांना दिल्यावर मंगळवारी 5 जानेवारी रोजी बुलडाणा शहर पोलिसांनी गेवराई येथून आरोपी दिपकसिंग प्रल्हादसिंग टाक यानेताब्यात घेतले आहे.दरम्यान चौकशीसाठी आज बुधवारी आरोपीला न्यायालयासमोर हजर केले असता त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे.अधिक तपास बुलडाणा पोलिस करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here