काँग्रेस कार्यकर्त्यांवरील अन्याय सहन करणार नाही – ना.यशोमती ठाकूर देऊळघाट येथे साधला कार्यकर्त्यांशी संवाद.

0
40

काँग्रेस कार्यकर्त्यांवरील अन्याय सहन करणार नाही – ना.यशोमती ठाकूर देऊळघाट येथे साधला कार्यकर्त्यांशी संवाद.

काँग्रेस पक्षाला मजबूत करण्यासाठी प्रत्येक कार्यकर्ता महत्त्वाचा आहे, त्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यावर कदापी अन्याय सहन करणार नाही, असा इशारा देत, तुम्ही हाक द्या मी मदतीसाठी धावून येईल,असा विश्वासही महिला व बालविकास मंत्री यशोमतीताई ठाकूर यांनी देऊळघाट येथे व्यक्त केला.
महाराष्ट्र राज्याचे महिला व बालकविकास मंत्री तथा बुलडाणा जिल्हा संपर्कमंत्री श्रीमती यशोमतीताई ठाकूर ह्या आज 23 जानेवारी रोजी बुलडाणा जिल्हा दौऱ्यावर आले असता त्या ग्राम देऊळघाट येथे बुलडाणा पंचायत समितीचे माजी उपसभापती मुश्ताक अहमद यांच्या निवासस्थानी सकाळी पोहोचल्या व कार्यकर्त्यांशीत्यांनी संवाद साधला.या वेळी त्यांच्या सोबत जिल्हा काँग्रेस कमेटी अध्यक्ष व माजी आमदार राहुल बोन्द्रे, बुलडाणाचे माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ सुद्धा उपस्थित होते.15 जानेवारी रोजी देऊळघाट येथे ग्रामपंचायत निवडणूक संपल्या नंतर विरोधी पॅनलच्या काही गुंड प्रवृत्तीचे लोकांनी मुश्ताक अहमद यांच्या घरावर दगडफेक करत हल्ला केला होता. यात 2 काँग्रेस कार्यकर्ता जख्मी झाले होते. त्यानंतर पोलिसाने निष्पाप लोकांवरच गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल केले व काहीच संबंध नसतांना काही लोकांना अटक केली आहे,असा आरोप ना. यशोमती ठाकूर यांच्याकडे करण्यात आला.प्रत्येक काँग्रेस कार्यकर्त्याला बळ देण्याची माझी जबाबदारी आहे. आपण हाक द्या, धावून येईल असा विश्वास ना. यशोमती ठाकूर यांनी यावेळी व्यक्त केला. याप्रसंगी मोठ्या प्रमाणात काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here