मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या दौऱ्यासाठी प्रशासन सज्ज सुरक्षा अधिकारी व व्ही आय आय पी ना कोव्हीड चाचणी अनिवार्य

0
157
  1. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या दौऱ्यासाठी प्रशासन सज्ज
    सुरक्षा अधिकारी व व्ही आय आय पी ना कोव्हीड चाचणी अनिवार्य

संदीप मापारी पाटील
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या दौऱ्यानिमित्त प्रशासनाकडुन जय्यत तयारी झाली असुन प्रशासन सज्ज झाले आहे मुख्यमंत्रयाच्या सुरक्षा ताफातील अधिकारी व व्ही आय आय पी तसेच संबधीत अधिकाऱ्याची कोव्हीड चाचणी अनिवार्य केली आहे त्यामुळे लोणार पोलीस स्टेशनेचे वरिष्ठ अधिकारी रविद्र देशमुख यांनी स्वत: तपासणी करत आपल्या ईतर अधिकाऱ्याची तसेच अधिकाऱ्याची कॉमेडी टेस्ट करण्यासंदर्भात पोलीस ठाण्यात आवारातच
व्यवस्था केली होती
मुख्यमंत्री 5 फेब्रुवारी रोजी लोणार येथे येणार असल्याकारणामुळे प्रशासनाकडुन मुख्यमंत्री व पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांचा दौरा निश्चीत
झाल्यामुळे धावपळ सुरू आहे यासाठी पोलीस प्रशासन, महसुल प्रशासन, वनविभाग प्रशासन नगरपालीका प्रशासन, विदयुत वितरण कंपनीचे कर्मचारी कामाला
लागली आहे शहरातील रस्ते स्वच्छ करण्यासाठी तसेच रस्त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा अडथळा होउ नये यासाठी प्रयत्न करीत आहे मुख्यमंत्री व पर्यटन मंत्री
यांच्या सुरक्षेतेसाठी पोलीस प्रशासनाकडुन 3 डि वाय एस पी , 12 पोलीस निरीक्षक , 40 पोलीस सहाय्यक निरीक्षक , 318 महीला पोलीस कर्मचारी ,10 साध्या
वेशातील कर्मचारी अशा प्रकारचा तगडा बदोबस्त लावण्यात आलेला आहे. मुख्यमंत्री व पर्यटन मंत्री लोणार सरोवरास भेट देणारे पहीले मुख्यमंत्री असुन या
माध्यमातुन लोणार सरोवराचा सर्वागीन विकासासाठी मोठी घोषणा होण्याचे संकेत मिळत असल्याने लोणार वाशीयासाठी ही भेट अनोखी ठरणार हे मात्र निश्चीत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here