हिवरा आश्रम येथे साध्या पद्धतीने विवेकानंद जन्मोत्सव साजरा…
अँकर – बुलडाणा जिल्ह्यातील सर्वात मोठी हिवरा आश्रम येथील महापंगत म्हणून ओळख असलेल्या स्वामी विवेकानंद जन्मोत्सवाची महापंगत या वर्षी कोरोनाचे संकट लक्षात घेता मर्यादित उपस्थितीत पार पडली आहे. हा निर्णय विवेकानंद आश्रम प्रशासनाने घेतला आहे… हिवरा येथील संत शुकदास महाराज यांच्या आश्रमात ही दरवर्षी महापंगत होते आणि यासाठी दोन लाख भाविक या ठिकाणी महाप्रसाद घेतात. 2, 3 आणि 4 फेब्रुवारी या तीन दिवशी विवेकानंद जन्मोत्सव मर्यादित नागरिकांच्या उपस्थितीत संपन्न होत आहे.
व्हिओ – यावर्षी महापंगत, यात्रा, मिरवणूक, भजनी, दिंड्या आदी कार्यक्रम रद्द करण्यात आलेय. कार्यक्रमासाठी नामवंत प्रबोधनकारांना, कलावंतांना निमंत्रित केले असून, त्यांचे कार्यक्रम ऑनलाइन पद्धतीने प्रसारित करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे, कार्यक्रमासाठी आणि उत्सवासाठी भाविकांनी गर्दी करू नये. घरी राहूनच कार्यक्रमात सहभागी न होण्याचे आवाहन आश्रमाच्या कार्यकारी मंडळाने केले होते.या वर्षी अत्यन्त अनोख्या आणि साध्या पद्धतीने हा उत्सव साजरा झाला आहे..
बाईट – संतोष गोरे( सचिव ,हिवरा आश्रम)