Story Title/Slug . *खरीप हंगामात बी बियाणे आणि खतांची कुठेही टंचाई भासणार नाही या दृष्टिकोनातून नियोजन करावे…. पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे.*
*बुलडाणा* : आगामी खरीप हंगामात बी बियाणे आणि खतांची कुठेही टंचाई भासणार नाही या दृष्टिकोनातून नियोजन करावे असे निर्देश बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांनी आज बुलढाणा येथे दिले.
आगामी खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर बी बियाणे खते यांच्या उपलब्ध ते संदर्भात माहिती जाणून घेण्यासाठी खरीप आढावा बैठक आज 3 मे रोजी बुलढाणा येथील जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये घेण्यात आली कोरोना संसर्गाचा वाढत प्रादुर्भाव लक्षात घेता ही बैठक दूर दृश्य प्रणालीद्वारे घेण्यात आली या बैठकीमध्ये पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे जिल्हाधिकारी रामामूर्ती कृषी विभागाचे अधिकारी श्री नाईक हे उपस्थित होते तर लोकप्रतिनिधी अधिकारी दूरदृष्टी प्रणालीद्वारे या बैठकीमध्ये सहभागी झाले होते खरीप हंगामासाठी जिल्ह्यात शेतकऱ्यांना लागणारे बी-बियाणे खतांच्या मात्रा आणि औषधी यांच्या उपलब्धते बाबत माहिती घेण्यात आली शिवाय शेतकऱ्यांना बी बियाणे साठी कुठेही वणवण फिरावे लागणार नाही या दृष्टिकोनातून नियोजन करावे असे निर्देश यावेळी पालकमंत्री राजेंद्र शिंगणे यांनी दिले बुलढाणा जिल्ह्याचे खरीप क्षेत्रात सोयाबीन आणि कपाशीचे पीक महत्त्वाचे असल्याने या पिकांच्या बियाणे उपलब्धतेबाबतही यावेळी प्रकर्षाने आढावा घेण्यात आला
शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध करून देताना बँकेसमोर शेतकऱ्यांची गर्दी होणार नाही या दृष्टिकोनातून बँकांनी वेळीच नियोजन करावे आदल्या दिवशी बँकांनी कर्ज वितरित करणाऱ्या शेतकऱ्यांना माहिती देऊन निर्धारित वेळेत शेतकऱ्यांनाच कर्ज घेण्यासाठी त्यांना बँकेत बोलवा आणि गर्दी टाळावी अशी सूचना डॉ राजेंद्र शिंगणे यांनी बँक अधिकाऱ्यांना दिल्या बुलढाणा जिल्ह्याला खरीप हंगामासाठी 181330 मे. टन खताची आवश्यकता असून सध्या जिल्ह्यामध्ये 75446 मे .टन रासायनिक खत त्याचा साठा उपलब्ध असल्याची माहिती यावेळी कृषी विभागाच्या वतीने देण्यात आले उत्पादन वाढीकरिता प्रत्येक तालुक्यातील कमी उत्पादन असलेले दोन गावे निवडून प्रात्यक्षिकांचे नियोजन करण्यासंदर्भात या बैठकीत चर्चा करण्यात आली निविष्ठांचे गुणवत्ता नियंत्रण करण्यासाठी 14 भरारी पथके स्थापन करण्यात आले आहेत अशी माहिती यावेळी देण्यात आली आहे जिल्ह्यात एकूण 955205 जमीन आरोग्य पत्रिका वितरण करण्यात आला आहे व जमीन आरोग्य पत्रिकेनुसार खतांची शिफारस शेतकऱ्यांना करण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली