पं.बंगाल मध्ये झालेल्या लोकशाही विरोधी कृतीचे भाजपा तर्फे “जाहिर निषेध”

0
59

पं.बंगाल मध्ये झालेल्या लोकशाही विरोधी कृतीचे भाजपा तर्फे “जाहिर निषेध”

बुलडाणा:- पश्चिम बंगाल मध्ये नुकतेच विधानसभेची निवडणूक संपन्न झाली.
या निवडणुकी दरम्यान तृणमूल कोंग्रेस च्या गुंडांणी अनेक भाजपा कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्या झालेल्या हत्या,कार्यालयाची तोड़फोड़,जाळपोळ या घटनेचा निषेध नोदविण्यासाठी विजयराज शिंदे यांच्या नेतृत्वात आज 5/5/2021 रोजी जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन निवेदन देऊन बुलडान्यात लोकशाही मार्गाने निषेध व्यक्त करून मारेकऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

निवेदनात नमूद आहे की,
या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टीला घवघवीत यश मिळाले व प्रमुख विरोधी पक्ष म्हणून भाजपाला मान्यता मिळाली. भारतीय जनता पार्टिने लोकशाही मार्गाने जनतेचा विश्वास संपादन करून पं.बंगाल राज्यात आपले भरीव अस्तित्व तयार केले आहे.परंतु पश्चिम बंगाल मधिल या भारतीय जनता पार्टी च्या यशाने तृणमूल कोंग्रेस पक्षाची गुंडगिरी व हुकुमशाही विरोधात कौल दिल्याने आता तृणमूल कोंग्रेस कडून भाजपा कार्यालयाची तोडफोड व पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मारहाण सुरु आहे. मारझोड़,जाळपोळ करून भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते यांची हत्या करण्यात आली आहे. झालेल्या ह्या हत्या म्हणजे फक्त मानवी हत्या असून तृणमूल कांग्रेस ने केलेली लोकशाहीची हत्या आहे.
त्यामुळे आम्ही सर्व भारतीय जनता पार्टिचे पदाधिकारी व कार्यकर्ते या घटनेचा,तृणमूल कोंग्रेस चा तिव्र भावनेने “जाहिर निषेध” व्यक्त करतो.
तसेच तृणमूल कोंग्रेस च्या ह्या हल्ल्यात गेल्या काही वर्षापासून हिंसाचारात बळी पडलेल्या भाजपा कार्यकर्त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो.तसेच या कठिन काळात पं.बंगाल मधील कार्यकर्त्यांच्या पाठीशी आम्ही खंबिर उभे राहून हा संघर्ष त्यांच्या एकटयाचा नसून लोकशाहीवर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येक नागरिकांचा आहे.
त्यामुळे घड़लेल्या या लोकशाही विरोधी कृत्याचा,गुंडगिरी प्रवृत्तिचा आम्ही पुन्हा एकदा “जाहिर निषेध” व्यक्त करून या समाज विघातक प्रवृतींवर कठोर कारवाई होण्यासाठी आपल्या स्तरावरुन योग्य कार्यवाही व्हावी. अशी विनंती निवेदना अंति करण्यात आली आहे.
निवेदन सादर करते वेळी किसान मोर्च्याचे प्रदेश सचिव दिपक वारे,महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष सिंधुताई खेडेकर,जिल्हा सरचिटणीस अल्काताई पाठक,महिला तालुकाध्यक्ष मायाताई पद्ममने,तालुका सरचिटणीस अर्जुन दांडगे,नगरसेवक अरविंद होंडे,वैभव इंगले,मंदार बाहेकर,कुलदीप पवार,यतिन पाठक उपस्थिति होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here