**बुलडाणा जिल्ह्यात पुढील 10 दिवस कडक लॉकडाऊन*
: – बुलढाणा जिल्ह्यामध्ये कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता ही साखळी तोडण्याच्या दृष्टिकोनातून पुढील दहा दिवस कडक लॉकडाऊन पाळण्यात येणार आहे यासंदर्भात चे निर्देश बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांनी जिल्हा प्रशासनाला दिले
-लॉकडाऊन असतानाही अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली नागरिकांची रस्त्यावर गर्दी पाहायला मिळत होती.म्हणुन बुलडाणा जिल्ह्यात कोरोनाचा साखळी तुटण्याऐवजी कोरोना रुग्ण संख्येत वाढ होत आहे अशा सूचना लोकप्रतिनिधींनी आज 9 मे रोजी बुलडाणा येथे जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या आढावा बैठक दिल्या या बैठकी दरम्यान कोरोनाचा संसर्ग कमी करण्याच्या दृष्टीने कडक लॉकडाऊनचे निर्बंध लावण्या संदर्भात सर्व लोक प्रतिनिधीनी एक मुखाने मागणी केली.त्यामूळे 10 मे ते 20 मे असा दहा दिवसाचा कडक लॉकडाऊन बुलडाणा जिल्ह्यामध्ये लागु करण्यात येणार आहे,केवळ मेडिकल सेवा वगळता ईतर आस्थापने पूर्णत: बंद ठेवण्यात येणार आहे,जिल्ह्या अंतर्गत एसटी प्रवासी वाहतूक सेवा बंद ठेवण्यात येणार आहे,याशिवाय ईतर धार्मिक कार्यक्रमांना बंदी घालण्यात आली,तसेच कडक लॉकडाऊन पाळण्याच्या द्रुष्टीने विशेष आदेश पोलिस विभागाला देण्यात आली आहे. आज जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीला बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे खासदार प्रतापराव जाधव आमदार संजय गायकवाड आमदार संजय कुटे आमदार विद्याताई महाले आमदार आकाश फुंडकर आमदार राजेश एकडे यांच्यासह जिल्हाधिकारी राममूर्ती जिल्हा पोलिस अधीक्षक अरविंद चावरिया आरोग्य विभागाचे अधिकारी यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते या बैठकी दरम्यान बुलढाणा जिल्ह्यातील कोरोना रुग्ण संख्येचा आढावा आणि वैद्यकीय सुविधेचा आढावा घेण्यात आला सोबतच जिल्ह्यामध्ये करण्यात येत असलेल्या लसीकरणा संदर्भातील माहितीही यावेळी जाणून घेण्यात आले जिल्ह्यात कोरोना चा प्रादुर्भाव कमी करण्याच्या दृष्टिकोनातून जास्तीत जास्त लसीकरण करण्यासंदर्भात ही संबंधित विभागांना सूचना करण्यात आल्या
vis 3 फाा
*Yuwaraj wagh buldana*