वाहनांमध्ये इंधन भरण्यासाठी वाहनधारकांच्या पेट्रोल पंपासमोर रांगाच रांगा

0
190

वाहनांमध्ये इंधन भरण्यासाठी वाहनधारकांच्या पेट्रोल पंपासमोर रांगाच रांगा

बुलढाणा जिल्ह्यामध्ये कडक लॉकडाऊन पाळण्यात येणार आहे या पार्श्वभूमीवर वाहनांमध्ये इंधन भरण्यासाठी बुलढाणा शहरातील पेट्रोल पंप नागरिकांनी एकच गर्दी केली होती त्यामुळे पेट्रोल पंप परिसरामध्ये वाहनांच्या आणि नागरिकांच्या लांबच लांब रांगा दिसून आलाय

बुलढाणा जिल्हपामध्ये जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या बुलढाणा शहरामध्ये कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता प्रशासन कठोर भूमिका घेत आहे पार्श्‍वभूमीवर 10 मे ते 20 मे दरम्यान संपूर्ण जिल्ह्यामध्ये मेडिकल सेवा वगळता इतर प्रतिष्ठाने पूर्णतः बंद ठेवण्याचे निर्णय बुलढाणा जिल्हा प्रशासनाच्या वतीने घेण्यात आला आहे दहा दिवस पेट्रोल मिळणार नाही त्यामुळे आपल्या वाहनांमध्ये पुरेसे इंधन आजच भरून घ्यावे या दृष्टिकोनातून बुलढाणा शहरातील वाहनधारकांनी पेट्रोल पंपावर इंधन भरण्यासाठी गर्दी केली होती त्यामुळे पेट्रोल पंप परिसरामध्ये लांबच लांब रांगा दिसून आल्या प्रशासन कॊरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी कडक भूमिका घेत आहे तर दुसरीकडे मात्र प्रत्येक नागरिक आपल्या सोयीसाठी व सुविधेसाठी गर्दी करत आहे असंच चित्र आज दहा मेच्या सकाळी पेट्रोल पंप परिसरामध्ये दिसून आले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here