*टिव्ही जर्नालिस्ट असोसिएशनच्या मागणीला यश*
नागरिक आणि प्रशासन यांच्यामध्ये समन्वय साधण्यासाठी वृत्तांकन करण्याची जबाबदारी पत्रकारांवर असल्याने लॉकडडॉउन च्या काळामध्ये सुद्धा पत्रकारांना फ्रन्टलाइन वर्कर्स प्रमाणेच पेट्रोल सुविधा आणि इतर सुविधा मिळाव्यात अशा आशयाचे निवेदन टीव्ही जर्नालिस्ट असोसिएशनच्या वतीने जिल्हाधिकार्यांना निवेदन देऊन प्रशासनाचे लक्ष वेधले असता प्रशासनाने सुद्धा सकारात्मक भूमिका दाखवा आदेशान्वये माध्यमांच्या प्रतिनिधींना पेट्रोल उपलब्ध करून देण्यास त्या दृष्टिकोनातून आदेश निर्गमित केले आहेत
बुलडाणा जिल्हाधिकारी यांच्या मार्फत कोरोना नियमाचे पालन करण्यासाठी काढण्यात येणाऱ्या आदेशामध्ये पत्रकारांचा नामोउल्लेख नसल्याकारणाने फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या सुविधा पत्रकारांना मिळत नाही कोरोनाच्या संकट काळामध्ये प्रशासन आणि नागरिकांनी मध्ये दुवा म्हणून पत्रकार या संकट काळात ही जीवाची पर्वा न करता वृत्तांकन करून समाज सेवा करत आहे त्यामुळे पत्रकार बांधवांना फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांप्रमाणेच इतर सुविधा मिळाव्यात अशा आशयाचे निवेदन 9 मे रोजी निवासी जिल्हाधिकारी दिनेश गिते यांना टीव्ही जर्नालिस्टचे अध्यक्ष वसीम शेख सचिव युवराज वाघ जिल्हा प्रवक्ता संदीप शुक्ला जिल्हा प्रसिद्धी प्रमुख नितीन कानडजे पाटील पत्रकार संघाचे राजेश डिडोळ्कर यांनी दिले त्यांत जिल्हाधिकाऱ्यांनी सकारात्मक भूमिका घेऊन कडक लाकडाऊनच्या आदेशामध्ये प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना सुविधा देण्याबाबतचे आदेश निर्गमित करण्यात आले आहे 10 दिवसाच्या कडक लॉकडाऊनमध्ये फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या सुविधा पत्रकारांना मिळणार आहे…