बुलडाणा जिल्ह्यात कडक लॉकडाऊनच्या अंमलबजावनीला सुरूवात

0
475

बुलडाणा जिल्ह्यात कडक लॉकडाऊनच्या अंमलबजावनीला सुरूवात

बुलढाणा जिल्ह्यामध्ये कोरोनाची साखळी तोडण्याच्या दृष्टीकोनातून कडक लॉक डाऊनची अंमलबजावणी आज 11 मे पासून सुरू करण्यात आली आहे अत्यावश्यक मेडिकल सेवा वगळता इतर आस्थापने पुर्णतःह बंद ठेवण्यात आली आहेत शहरातील पेट्रोल पंप सुद्धा बंद ठेवण्यात आले आहे बुलढाणा जिल्ह्यामध्ये दिवसा गणित कोरोना रुग्णसंख्या मध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होत असल्यामुळे कडक लॉक डाऊनची भूमिका घेत प्रशासनाने घेतली आहे विविध रस्ते बैरा गेट्सने बंद करण्यात आले असून वाहतुकीसाठी काही रस्ते सुरू ठेवण्यात आले आहेत रस्त्याने फिरणाऱ्या व्यक्तींची चौकशी करून अत्यावश्यक सेवा आणि दवाखान्यात जाणाऱ्या व्यक्तींना सोडण्यात येत आहे विनाकारण फिरणाऱ्या व्यक्तींवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे बुलढाणा शहरातील चौकाचौकांमध्ये पोलीस बंदोबस्त लावण्यात आला असून पोलीस रस्त्याने फिरणाऱ्या व्यक्तींची चौकशी करत आहे

 

*Yuwaraj wagh buldana*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here