हवेतील ऑक्सीजन मिळणार कोविंड रुग्णांना…. बुलडाणा येथील सरकारी कोविड हॉस्पीटल मध्ये ऑक्सिजन जनरेश प्लांट कार्यान्वित..

0
144

हवेतील ऑक्सीजन मिळणार कोविंड रुग्णांना…. बुलडाणा येथील सरकारी कोविड हॉस्पीटल मध्ये ऑक्सिजन जनरेश प्लांट कार्यान्वित..

▪️ *जिल्हा स्वंयपूर्ण करणार, ना. डॉ. राजेंद्र शिंगणे

बुलडाणा :  कोरोनाने हैराण केले असतांना ऑक्सिजन तुटवड्यावर निदान म्हणून ऑक्सिजन जनरेशन प्लांट पालकमंत्री ना. डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या प्रयत्नातून जिल्ह्यात ठिकठिकाणी उभारण्यात येत आहेत. आज १५ मे रोजी येथील स्त्री रुग्णालय समर्पित जिल्हा कोविड रुग्णालयात ऑक्सिजन जनरेशन प्लांट चेे ना. डॉ. शिंगणे यांच्या हस्ते
उद्घाटन ठेवण्यात आले होते, परंतु प्रसिद्धीपासून नेहमीच दूर राहणाऱ्या कर्तव्यदक्ष पालकमंत्र्यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उद्घाटनाची फॉरम्यालिटी रद्द करत फक्त पाहणी करून सदर प्लांट कार्यान्वित झाला असल्याची घोषणा केली.

जिल्ह्याला दररोज जवळपास १६ मे.टन ऑक्सिजन लागतो. आता या प्लांट व्दारे  ८० जम्बो सिलींडर हवेतील ऑक्सिजन २४ तासात उपलब्ध होणार आहे. विशेष म्हणजे सिलिंडरचा वापर न करता, थेट प्लांटपासून रुग्णांच्या बेडला ऑक्सिजन पाइपलाईन अटॅच करुन रुग्णांना ऑक्सिजन पुरविण्यात येईल. देऊळगावराजा, खामगाव, मलकापूर व इतरही ठिकाणी प्लांट लवकरच उभारण्यात येणार आहे. तिसऱ्या कोरोना लाटेच्या शक्यतेमुळे राज्य स्वंयपूर्ण होत असतांना बुलडाणा जिल्हा देखील सर्वार्थाने स्वंयपूर्ण करणार असल्याचा विश्वास अन्न व औषध प्रशासन मंत्री ना. डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी व्यक्त केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here