दहा दिवसांच्या कडक लॉकडाऊनमूळे बुलडाण्यात कोरोना पॉझिटिव्ह संख्येत घट..

0
68
  • दहा दिवसांच्या कडक लॉकडाऊनमूळे बुलडाण्यात कोरोना पॉझिटिव्ह संख्येत घट..

बुलडाणा:- जिल्ह्यात झपाट्याने वाढणाऱ्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने 10 में पासून 20 में पर्यंत रुग्णालये,मेडिकल वगळता सर्व सेवेला जिल्ह्यात कडक लॉकडाऊन लावण्यात आले होते.या लॉकडाऊनमध्ये कोणालाही बाहेर न निघण्याची सक्ती करण्यात आली होती.यामूळे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण संख्या घटतांना दिसत आहे.मागील बुधवारी 12 में ची पॉझिटिव्ह संख्या बघितली तर 5 हजार 599 घेण्यात आलेले स्वबच्या नमुन्यापैकी 1 हजार 143 नमुन्याचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले होते.आणि आठवड्यानंतर आज बुधवारी 19 में रोजी चाचणीसाठी घेण्यात आलेल्या 6 हजार 610 स्वबच्या नमुन्यापैकी 674 नमुन्याचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहे.

-12 में आणि 19 में रोजी इतकी मोजली गेली टक्केवारी-

बुधवारी 12 में रोजीची टक्केवारीची परिस्थिती बघितली तर 5 हजार 599 चाचणी करण्यात आलेल्या स्वबच्या नमुन्यापैकी 1 हजार 143 नमुन्याचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले होते.याच दिवशी 1 हजार 143 नमुन्याचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्याने त्या दिवशीचे 19.19 टक्के मोजले गेले तर 12 में पर्यंत 73 हजार 878 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाल्याने 15.14 टक्के मोजले गेले.यापैकी 68 हजार 626 रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना छुट्टी देण्यात आल्याने 92.89 टक्के मोजले गेले.तर कोरोनाने 490 रुग्णांचा मृत्यू झाला असून 0.66 टक्केवारी मोजली गेली.तर आज बुधवारी 19 में रोजीची टक्केवारीची परिस्थिती बघितली तर 6 हजार 610 चाचणी करण्यात आलेल्या स्वबच्या नमुन्यापैकी 674 नमुन्याचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहे.674 नमुन्याचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्याने आजच्या दिवशी 10.20 टक्के मोजले गेले तर आज 19 में पर्यंत 79 हजार 944 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाल्याने 15.29 टक्के मोजले गेले.यापैकी 73 हजार 909 रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना छुट्टी देण्यात आल्याने 92.45 टक्के मोजले गेले.तर कोरोनाने 532 रुग्णांचा मृत्यू झाला असून 0.67 टक्केवारी मोजली गेली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here