- : *कोरोनाविरुद्धच्या लढ्यासाठी हिंदुस्थान युनिलिव्हर कंपनीकडून शेगावात व्हेंटिलेटर्स
कोरोना विषाणू विरुद्धच्या लढ्यात हिंदुस्थान युनिलिव्हर लिमिटेड कंपनीकडून संत नागरी शेगाव येथील शाम सखा कोविड सेंटरला एक व्हेंटिलेटर्स भेट म्हणून देण्यात आले. शुक्रवारी दुपारी युनिलिव्हर च्या अधिकाऱ्यांनी कोविड सेंटरच्या डॉकटरांकडे व्हेंटिलेटर्स सुपूर्द केले.
: हिंदुस्थान युनिलिव्हर कंपनीने राज्याच्या वैद्यकीय शिक्षण व आरोग्य विभागाला १० कोटी रुपयांहून अधिक किंमतीच्या वैद्यकीय संसाधनांची मदत केली आहे. असून यात ५.०४ कोटी रुपयांच्या २८ हजार ८०० टेस्टिंग किटस, तसेच ५ कोटी रुपये किंमतीचे व्हेंटिलेटर्स, पीपीई किटस, मास्क, हातमोजे, पल्स ऑक्सीमिटर, ऑक्सिजन सकेंद्रक यांचा समावेश असलेली वैद्यकीय संसाधने उपलब्ध करून दिली आहेत. यामध्ये खामगाव येथील हिंदुस्थान युनिलिव्हर लिमिटेड च्या शाखेकडूनही व्हेंटिलेटर्स, पीपीई किटस, मास्क, हातमोजे, पल्स ऑक्सीमिटर, आदी संसाधने वाटपास सुरुवात झालेली असून शुक्रवारी शेगाव येथील शाम सखा कोविड सेंटरला एक व्हेंटिलेटर्स भेट म्हणून देण्यात आले. यावेळी हिंदुस्थान युनिलिव्हर लिमिटेड एचआर मॅनेजर दवेश तोमर,
सिनियर एचआर एकझिक्युटिव्ह शशी वैद्य, एचआर सिनियर एकझिक्युटिव्ह नरेन बीडवाई, हिंदुस्तान लिवर कामगार संघाचे उपाध्यक्ष गजानन राऊत आदींची यांची उपस्थिती होती. शाम सखा चे डॉ.विनय अग्रवाल, डॉ. चरखा, डॉ. राजपूत यांनी युनिलिव्हर चे आभार मानले.
खामगाव शहरासह जिल्ह्यातील विविध फ्रंट लाईनवर काम करणाऱ्यांना कंपनीकडून कोविड-१९ विषाणूच्या विरोधात लढन्यासाठी पीपीई किटस, मास्क, हातमोजे, पल्स ऑक्सीमिटर, आदी संसाधने देण्यात येणार असलायची माहिती देण्यात आली.