बुलढाणा जिल्ह्यात दोन ठिकाणी पोलिसांनी पकडला ११ लाखांचा गुटखा ; ३ आरोपी अटक, १ फरार

0
171

*बुलढाणा जिल्ह्यात दोन ठिकाणी पोलिसांनी पकडला ११ लाखांचा गुटखा ;* ३ आरोपी अटक, १ फरार**

: बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव आणि संग्रामपूर तालुक्यातील लाडणापुर येथे स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई करीत शनिवारी सायंकाळी ११ लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त करण्यात यश मिळविले. याप्रकरणी ३ आरोपीना अटक करण्यात यश मिळाले असून १ फरार फरार होण्यात यशस्वी झाला आहे

: बुलढाणा येथील स्थानिक गुन्हे शाखेला खामगांव शहरात अवैध गुटखा साठवून ठेवल्याची गुप्त माहिती मिळाली त्या माहितीच्या आधारे शनिवारी सायंकाळी खामगांव येथील तलाव रोड वरील सिंधी कॉलोनी भागात शंकर वाधवानी यांच्या घरी छापा मारला असता त्या ठिकाणी शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा मिळून आला. यामध्ये प्रतिबंधित असलेला विमल पान मसाला, नजर गुटका, तंबाखू ,पान बहार याचा साथ मिळून आला. अशाप्रकारे एकूण १ लाख ४ हजार ९५० रुपयांचा सुगंधित पानमसाला व गुटखा जप्त करण्यात आला. यावेळी आरोपी शंकर घनश्यामदास वाधवानी याच्या विरुद्ध पोलिसांनी महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला व मानवी शरीरास अपायकारक असलेले प्रतिबंधित पान मसाला गुटखा विक्री केल्याबाबत कलम १८८, २६९,२७२,२७३ नुसार गुन्हा दाखल करण्यात आलं आहे.

: दुसरीकडे संग्रामपूर येथे सुद्धा तालुक्यातील लाडणापुर येथे धाड टाकून १० लाख ३२ हजार ५७० रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला. यामध्ये पोलिसांनी चारचाकी वाहन सुद्धा पोलिसांनी जप्त केले आहे. यामुळे पोलिसांनी एकूण १५ लाख ३२ हजार ५७० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी सोनाळा पोलीस स्टेशन रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी आरोपी देवीलाल जयस्वाल, नितीन जयस्वाल यांना अटक करण्यात आली आहे. तर तिसरा आरोपी धीरज जयस्वाल हा फरार झाला आहे. पोलिसांनी या आरोपींविरुद्ध याच्या विरुद्ध पोलिसांनी महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला व मानवी शरीरास अपायकारक असलेले प्रतिबंधित पान मसाला गुटखा विक्री केल्याबाबत कलम १८८, २६९,२७२,२७३ नुसार कारवाई केली आहे.

vis 4 फाईल

*Yuwaraj wagh buldana*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here