बुलडाणा जिल्हा परिषद उपाध्यक्षा सौ.कमलताई बुधवत यांनी दिले मुख्यमंत्री सहाय्यता निधीत एक वर्षाचे मानधन
-
कोरोना महामारीची दुसरी लाट अतिशय गंभीर रुग्णांची संख्या वाढतांना दिसत आहे. मृत्यूचे प्रमाणही वाढत असल्यामुळे अनेकांना आर्थिक मदतीची गरज आहे. सर्वच जण आपापल्या परीने कोरोना रुग्ण, गरजु यांना मदत करत आहे. बुलडाणा जिल्हा परिषद उपाध्यक्षा सौ कमलताई जालिंधर बुधवत यांनी आपले एक वर्षाचे मानधन १ लक्ष ५१ हजार रु. मुख्यमंत्री सहाय्यता निधीत दिले आहे. दि.२० रोजी जालिंधर बुधवत शिवसेना जिल्हा प्रमुख व जि प उपाध्यक्षा मा सौ कमलताई बुधवत यांनी बुलडाणा जिल्हाधिकारी यांच्याकडे धनादेश सुपूर्द केला.
यावेळी पं स उपसभापती श्रीकांत पवार, पं स सदस्य दिलीप सिनकर, तालुका प्रमुख लखन गाडेकर, वैद्यकीय आघाडी तालुका प्र डॉ अरुण पोफळे, उप ता प्र विजय इतवारे, अमोल शिंदे, शेषराव दादा सावळे, शिवसेना प्रवक्ते गजानन धांडे, अमोल बुधवत, युवासेनेचे संदीप पालकर, योग पालकर, स्वप्नील साखळे, गोपाल चांदडकर यांची उपस्थिती होती.!