- *स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी सुरू केला बुलढाणा जिल्हा परिषद येथे बैठा सत्याग्रह*
चिखली तालुक्यातील पालकमंत्री पांदन रस्त्याचे काम तात्काळ सुरू करावे किनोळा गावामध्ये कायमस्वरूपी ग्रामसेवक द्यावा या मागणीला कडे लक्ष वेधण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी बुलढाणा जिल्हा परिषदेच्या समोर बैठे सत्याग्रह सुरू केला आहे जोपर्यंत लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही अशी भूमिका स्वाभिमानी शेतकरी संघटनेने घेतला चिखली तालुक्यात पालकमंत्री पांदन रस्त्यांची कामे जिल्हा परिषदेने स्वतंत्ररित्या टेंडर न काढता संयुक्तरित्या एकस टेंडर काढून मर्जीतील ठेकेदाराला टेंडर देण्याच्या दृष्टिकोनातून कारवाई करत आहे असा आरोप करून टेंडर प्रोसेस तात्काळ सुरू करावी या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी बुलढाणा जिल्हा परिषदेच्या कार्यालयासमोर बैठा सत्याग्रह करून आंदोलन सुरू केले आहे शिवाय किनोळा या गावांमध्ये डेंगू चे आणि covid-19 रुग्ण झपाट्याने वाढत असतान येथे कायमस्वरूपी ग्रामसेवक नाही त्या गावाला कायमस्वरूपी ग्रामसेवक द्यावा अशी मागणी या वेळी त्यांनी केली आहे