Home आपला जिल्हा *कृषी विभागाणे पुढाकार घेऊन बियाणे,खते बांधावर द्यावे.स्वाभिमानीचे विनायक सरनाईक यांची कृषी विभागाकडे...
*कृषी विभागाणे पुढाकार घेऊन बियाणे,खते बांधावर द्यावे.स्वाभिमानीचे विनायक सरनाईक यांची कृषी विभागाकडे मागणी*
- चिखली–खरीप हंगामाला सुरुवात होणार असून शेतकरी शेती मशागतीच्या कामास लागला आहे.शेतकऱ्यांना खते,बियाण्यांच्या खरेदीसाठी गैरसोय होऊ नये, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांची कृषी केंद्रांवर गर्दी होऊ नये,बियाणे, खतांची मागणी केल्यास शेतकऱ्यांना बियाणे व खते आॅनलाईन नोंदणीच्या माध्यमातुन बांधावर उपलब्ध करून देण्याचा उपक्रम वाशिम कृषी विभागाणे सुरु केला आहे.तोच उपक्रम जिल्हा कृषी विभागाने राबवुन शेतकऱ्यांची
ऑनलाइन नोंदणी करुण बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खते,बियाणे बांधावर देण्यात यावे,अशी मागणी स्वाभिमानीचे नेते तथा डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे सदस्य विनायक सरनाईक यांनी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी यांच्याकडे दि२४मे२०२१रोजी केली आहे.
- कोरोनाचे संकट पाहता शेतकर्याना थेट बांधावर खते आणि बियाणे उपलब्ध करुण देण्याचा निर्णय वाशिम कृषी विभागाणे घेतला आहे.यासाठी कृषी विभागाणे एक स्वतंत्र गुगल लिंक तयार केली आहे. गुगल लिंक व्दारे तालुक्यासाठी फाॅम तयार करण्यात आला असुन संबंधीत नजीकच्या कृषी सेवा केंद्र निवडीची सुविधा शेतकरी व शेतकरी गटांना तयार करुण देण्यात आली आहे.यामधे शेतकर्याना आॅनलाइन नोंदणी करता येणार आहे. खते,बियाणे मिळण्यासाठी तालुकास्तरावर माहिती स्तनियंत्रण कक्ष देखील स्थापण केला गेला आहे.तर कृषी सहाय्यक व कृषी विभागा मार्फत बि-बियाणे,खते मागणी नुसार बांधावर पोच दिले जाणार असल्याने वाशिम कृषी विभागा प्रमाणेच कोरोनाची परीस्थीती पाहता बुलढाणा जिल्ह्यातही हा उपक्रम कृषी विभागाकडुन राबवण्यात यावा, शेतकर्याची आॅनलाइन नोंदणी करुण सर्वच तालुक्यामधे शेतकर्याना बांधावर,घरपोच खते,बियाणे उपलब्ध करुण देण्यात यावे,यावर तातडीने उपाययोजना व्हाव्यात व शेतकर्याना कडक निर्बध काळात सहकार्य करावे अशी मागणी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी नरेंद्र नाईक,तालुका कृषी अधिकारी शिंदे यांच्याकडे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते तथा डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कार्यकारी परीषद सदस्य विनायक सरनाईक यांनी एका पत्राद्वारे केली आहे.
- मागील वर्षी केले होते आॅफलाईन नियोजन…
- मागील वर्षी कोरोना काळात चिखली कृषी विभागाने चांगल्या प्रकारे नियोजन केले होते.आॅफलाईन पध्दतीने नोंदणी करुण काहिंना बांधावर तर काहि शेतकर्याना घरपोच खते देण्यात आले होते.यामुळे अनेक शेतकर्याना दिलासा मिळाला होता.