– नियमांचे उल्लंघन प्रकरणी काँग्रेस कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्याची भाजपाची मागणी…
बुलडाणा – काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे बुलडाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर असतांना त्यांच्या विविध कार्यक्रमासाठी बुलडाण्यात उपस्थित राहून या कार्यक्रमात शेकडो पदाधिकारी व कार्यकर्ते एकत्रित येऊन गर्दी झाल्याने संचार बंदी व कोविड नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी बुलडाण्यात गर्दी जमविणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी भाजपाचे जिल्हाध्यक्ष एड.आकाश फुडकरांनी पोलिसांना केली आहे.गुन्हे न दाखल झाल्यास या विरोधात जिल्हाभर आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
गेल्या आठवड्यामध्ये भाजपाकडून ओबीसी आरक्षणासंदर्भात राज्य सरकार विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले होते, त्यावेळी कोविड नियमाचे उल्लंघन केल्याप्रकरणी भाजपा कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते, ही कारवाई सूड बुद्दीने आणि द्वेषातून केली असल्याचा आरोप भाजपा जिल्हाध्यक्ष आमदार आकाश फुंडकरांनी करून गुरुवारी झालेल्या नाना पटोले यांच्या बुलडाणा दौऱ्यात विविध कार्यक्रमासाठी बुलडाण्यात शेकडो पदाधिकारी व कार्यकर्ते एकत्रित येऊन गर्दी झाल्याने व सोशल डिस्टनसिंग न पाळल्याने बुलडाण्यात देखील नियमांचे उल्लंघन झाले असल्याने या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात यावे. अशी मागणी केली आहे.कारवाई न झाल्यास आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
-खांमगाव आणि शेंगावत काँग्रेस कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल-
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे बुलडाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना त्यांनी मेहकर, चिखली, बुलडाणा, खामगाव त्याचबरोबर शेगाव या ठिकाणी विविध कार्यक्रमांना उपस्थित राहिले होते. या कार्यक्रमात शेकडो पदाधिकारी व कार्यकर्ते एकत्रित येऊन गर्दी झाल्याने संचार बंदी व कोविड नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी शेगाव आणि खामगाव मध्ये 29 काँग्रेस कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.