दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दिवाळीपूर्वी सरसकट मदत जमा करा अन्यथा काळेदिवे लावून दिवाळी साजरी करू ..? भाजपा
राज्यातील महाविकास आघाडी सरकारने दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दिवाळीपूर्वी सरसकट मदत जमा करा अन्यथा काळेदिवे लावून दिवाळी साजरी करू असा इशारा भाजपाच्या आमदार श्वेताताई महाले यांनी दिलाय
अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तहसीलवर भाजपाच्या वतीने आसूड मोर्चाचं आयोजन केलं होतं- बुलडाणा जिल्ह्यात अतिवृष्टी झाल्याने शेतकऱ्यांची पिके खराब झालीय , त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठे नुकसान झालेय, पुढील वर्षभर घर , मुलांचे शिक्षण, आरोग्य सह इतर खर्च कसा भागवयाचा , या चिंतेत आता शेतकरी आहे.. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारला जागे करण्यासाठी
आज 25 ऑक्टोबरला भाजप च्या वतीने चिखली तहसील कार्यालयावर आसूड मोर्चाचा आयोजन करून राज्यातील महा विकास आघाडी चा निषेध नोंदविला आहे छत्रपती शिवाजी महाराज चौकातून या निषेध आसूड अमोशा ला सुरुवात झाली त्यानंतर चिखली तहसील वर येऊन या संदर्भाचा निवेदन तहसिलदारामार्फत मुख्यमंत्र्यांना पाठवण्यात आले यामध्ये त्यांनी म्हटले आहे की विदर्भातील शेतकऱ्यांना सावत्र वागणूक बंद करून, शेतकऱ्यांना घोषणा केल्याप्रमाणे कोरडवाहू शेतकऱ्यांसाठी हेक्टरी 25,000 रुपये आणि बागायती शेतकऱ्यांसाठी हेक्टरी 50,000 हजार रुपये मदत तात्काळ जाहीर करून दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी, पिक विमा भरलेल्या सर्व शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम थेट खात्यात मिळावी, कृषी पंपांना किमान 10 तास वीजपुरवठा करावा, नादुरुस्त ट्रांसफार्मर ची दुरुस्ती तात्काळ व्हावी, आणि शेतकऱ्यांच्या मुलांना शैक्षणिक शुल्क माफ करावे, आदी मागण्या या मोर्चाच्या माध्यमातून करण्यात आले आहे मोर्चाचा समारोप हा जाहीर सभेत झाला त्यावेळी बोलताना आमदार श्वेता ताई महाले म्हणाले की तर राज्य सरकारने दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा न केल्यास काळे कंदील लावून दिवाळी साजरी करू असा इशारा त्यांनी दिला त्या आसूड मोर्चामध्ये शेतकरी बांधव आणि महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या