*जनतेला शुद्ध पाण्याचा पुरवठा व्हावा* – अर्चनाताई काजळे,
बुलडाणा ता.26, सध्या जिल्हाभर स्वच्छता सर्वेक्षणाचे डाटा इंट्री चे प्रशिक्षण सुरू आहे. अद्याप पर्यंत पंचायत समिती मलकापूर, मोताळा, देऊळगाव राजा आणि सिं.राजा प्रशिक्षण पूर्ण झालेले आहेत. सदर प्रशिक्षणाचे आयोजन जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन अंतर्गत पाणी गुणवत्ता शाखेने केलेले आहे. पंचायत समिती मलकापूर येथे प्रशिक्षणाच्या उद्घाटनप्रसंगी सभापती यांनी जनतेला शुद्ध पाण्याचा पुरवठा व्हावा असे आवाहन केले आहे.
आज पर्यंत पंचायत समिती मलकापूर, पंचायत समिती मोताळा, पंचायत समिती देऊळगाव राजा, पंचायत समिती सिंदखेडराजा येथील प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण झालेले आहेत. यामध्ये सहभागीने खूप छान उत्स्फूर्त प्रतिसाद देत यांमध्ये करावयाच्या डाटा एंट्रीची तांत्रिक माहिती व्यवस्थित समजून घेतली आहे. यामध्ये प्रशिक्षक म्हणून शरद ठाकूर तसेच कु. किरण शेजोळे यांनी मार्गदर्शन केले आहे. मलकापूर पंचायत समितीचे सभापती यांनी जनतेला शुद्ध पाण्याचा पुरवठा व्हावा असे या प्रशिक्षणाच्या उद्घाटनप्रसंगी आवाहन केले आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून मलकापूर येथे प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी पंचायत समिती मलकापूरचे उपसभापती क्षीरसागर यांची उपस्थिती होती. या प्रशिक्षणाचे आयोजन उपमुख्य कार्यकारी अधिकारी पाणी व स्वच्छता चंदनसिंग राजपूत यांच्या नियंत्रणाखाली आणि मा मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे. या प्रशिक्षणास तालुका आरोग्य अधिकारी, विस्तार अधिकारी, जलसुरक्षक आरोग्य सेवक, आरोग्य सहायक, गट संसाधन केंद्राचे गट समन्वयक आणि समूह समन्वयक यांनी सहभाग घेतला. यामध्ये सदर कर्मचाऱ्यांना स्वच्छता सर्वेक्षणाच्या डाटा एन्ट्री कशी करायची याबाबत तांत्रिक मार्गदर्शन करण्यात आले.
*पुढील नियोजन*
दिनांक 27 रोजी नांदुरा, संग्रामपूर दिनांक 28 रोजी चिखली, दिनांक 29 रोजी खामगाव, मेहकर, दिनांक 30 रोजी जळगाव जामोद, दिनांक 01 नोव्हेंबर रोजी बुलडाणा, लोणार असे नियोजन आहे. यामध्ये सर्व संबंधितांनी सक्रिय सहभाग घ्यावा आणि प्रशिक्षण यशस्वी करावे असे आवाहन मा मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते मॅडम यांनी केले आहे.