विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांचा आज जनता दरबार बुलढाण्यात….
- बुलढाणा ( प्रतिनिधी ) विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे आज बुलढाणा येथे जनता दरबार घेऊन जनतेच्या समस्यांचा ऑन द स्पॉट निपटारा करणार आहेत …
16 जानेवारीला जनतेच्या न्यायालयात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महा पत्रकार परिषद घेऊन विधानसभा अध्यक्षांनी शिवसेना आमदार अपात्रतेवर घेतलेल्या निर्णयाची चिरफाड केली तर आज विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे बुलढाण्यात जनता दरबार घेऊन जनतेचे प्रश्न जनतेच्या दरबारात सोडवण्यासाठी येत आहे….
बुलढाणा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या शेतकरी भवन येथे सकाळी दहा वाजता विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे हे बुलढाण्यात येत आहे येथेच जनाधिकार म्हणजे जनता दरबार घेवुन शेतकरी शेतमजूर व विविध विषयांवर च्या समस्या जाणून घेऊन त्या समस्या ऑन द स्पॉट सोडवण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करणार आहेत त्यानंतर दुपारी चार वाजता ते पत्रकार परिषद घेऊन पत्रकारांशी सुद्धा हितगुज करणार आहेत अशी माहिती उबाठा शिवसेना गटाचे जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत यांनी दिले आहे …