अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांनी घेतली बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोना संदर्भात आढावा बैठक*
Anchor : कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्याच्या दृष्टिकोनातून गावपातळीवरच विलेगीकरण कक्षाची स्थापन करून तेथेच रुग्णांवर उपचार करावेत अशा सूचना जिल्हा परिषदेला देण्यात आल्या आहेत अशी माहिती राज्याचे अन्न व औषधी प्रशासन मंत्री तथा बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांनी आज प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली
बुलढाणा जिल्ह्यातील कोरोना संदर्भातील आढावा आज 21 मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालया घेण्यात आला या बैठकी दरम्यान कोरोना सद्यस्थितीचा आढावा घेऊन भविष्यात येणाऱ्या अडचणी संदर्भात चर्चा करण्यात आली कोरोना आजारानंतर अनेकांना म्युकरमॅकोशस काळी बुरशीजन्य आजाराची लागण होत आहे या रुग्णांवर शासकीय रुग्णालयातच उपचार करण्याच्या दृष्टिकोनातून विशेष कक्ष स्थापन करण्यात आला असून अशा रुग्णांवर जिल्हा सामान्य रुग्णालय आतच शस्त्रक्रियाही केली जाणार आहे त्यासाठी वोटी वार्ड तयार करण्यात आल्याचे त्यांनी यावेळी सांगितले शिवाय भविष्यात तिसरे लाटेमध्ये बालकांवर कोरोनाचा प्रादुर्भाव होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे त्या दृष्टिकोनातून आम्ही खबरदारीचा उपाय म्हणून विशेष कक्ष निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून चर्चा करण्यात आली यामध्ये लहान मुलांसाठी वेगळे वार्ड ,डॉक्टर , औषघी उपकरणे सज्ज ठेवण्यासंदर्भात उपाय योजना सुचविण्यात आल्या या बैठकीला जिल्हाधिकारी राममूर्ती जिल्हा शल्य चिकित्सक विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते