*धाड येथील आधार कोवीड केअर सेंटरचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या हस्ते उद्घाटन*
बुलडाणा : : राज्यातील कोरोना परिस्थिती हाताळण्यासाठी राज्य सरकार अपयशी ठरले आहे असा घणाघाती आरोप राज्याचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी बुलढाणा जिल्ह्यातील धाड येथे केले
बुलढाणा जिल्ह्यातील धाड येथील आधार केअर सेंटरचे उद्घाटन आज 29 मे रोजी विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते यावेळी व्यासपीठावर विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर आमदार श्वेताताई महाले बुलढाणा अर्बन चे अध्यक्ष राधेश्याम चांडक माजी आमदार विजयराज शिंदे व्यासपीठावर उपस्थित होते
धाड येथील सहकार विद्या मंदिराच्या शाळेच्या प्रशस्त वास्तूमध्ये हे कोविड सेंटर सुरू होत आहे. यामध्ये 50 बेड सर्वसामान्य पॉझिटिव्ह रुग्णांच्या उपचारासाठी असणार आहे. कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा शासकीय नियमांप्रमाणे पूर्ण उपचार मोफत करण्यात येणार आहे. उपचारासाठी लागणारी औषधे, तपासण्या, नाष्टा , जेवण सुद्धा मोफत देण्यात येणार आहे.
*या उद्घाटन कार्यक्रमानंतर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर प्रसारमाध्यमांशी बोलत असताना ते म्हणाले की*
मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकार पूर्णतः अपयशी ठरले असून जाणीवपूर्वक आरक्षण कसं जाईल यासाठी राज्य सरकारने काळजी घेतली असा गंभीर आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी बुलढाणा येथे केले ते पुढे म्हणाले की भारतीय जनता पार्टीची स्पष्ट भूमिका आहे मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी संपूर्ण पाठबळ देणार आहे ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण मिळावे अशी भूमिका भाजपाचे आहे
संजय राऊत यांच्यावर टीका करताना प्रवीण दरेकर म्हणाले की संजय राऊतांना उठलं की दुसरे कोणतेच काम नाही सकाळी उठल्यानंतर केंद्रसरकारच्या नावानं शिमगा करायचा पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या नावाने शिमगा करायचा भारतीय जनता पार्टी आणि देवेंद्रजी यांना टार्गेट करायचे काम त्यांच आहे
आपलं अपयश आणि आपली अकार्यक्षमता कशी लपवायची हे त्यांच्याकडून शिकावं असेही ते म्हणाले मराठा आरक्षणाच्या संदर्भात हुकमी एक्का नरेंद्र मोदी आहे हे त्यांनी सांगायची गरज नाही आम्ही स्वतः जाऊन त्यांच्याकडे मराठा आरक्षणा संदर्भात मागणी करू परंतु आपल्या संविधानामध्ये एक प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेस आपल्याला काम करावं लागतं परंतु लोकांना गुमराह करण्यासाठी वेगवेगळे फंडे राज्य सरकारच्यावतीने उपयोगात आणले जात असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले
ग्रामीण भागात मध्ये कोरोणाची परिस्थिती बिकट आहे अशा परिस्थितीमध्ये सर्वसामान्य जनतेला आधार देण्याचे काम ग्रामीण स्तरावर तयार होणारे कोरोना केअर सेंटर देत आहे असेही त्यांनी यावेळी सांगितले
*Yuwaraj wagh buldana*