जुन्या पेन्शनसाठी संघर्ष यात्रा बुलढाण्यात
बुलडाणा = 1 नोहेंबर 2005 व त्यानंतर नियुक्त झालेल्या सरकारी व निमसरकारी कर्मचा-यांना जुनी पेन्शन लागू करा या मुख्य मागण्यांसाठी बुलडाणा आज येथे पेन्शन परिषद घेण्यात आली
मुंबई येथील आझाद मैदानावरुन 22 नोव्हेंबरला या संघर्ष यात्रा सुरू करण्यात आले असून ही यात्रा 22 जिल्हयात मार्गक्रमन करुन आज विदर्भाचे प्रवेशद्वार असलेल्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये आली या पेन्शन संघर्ष यात्रेचे रूपांतर पेन्शन परिषद मध्ये झालं या परिषदेला विविध विभागाचे कर्मचारी उपस्थित होते
1 नोव्हेंबर 2005 पासून शासकीय आणि निमशासकीय कर्मचा-यांना निवृत्ती पेन्शन योजना बंद करण्यात आले असून त्या जागी NPS ही योजना अस्तित्वात आली आहे N P S योजना रद्द करून पुन्हा जुनी पेन्शन योजना लागू करावी या मागणीसाठी या पेन्शन संघर्ष समिती ने आंदोलनात्मक भूमिका घेतली आहे येत्या हिवाळी अधिवेशनामध्ये ही योजना राज्य सरकारने मंजूर करावी अशी आग्रही मागणी या संघर्ष समितीने केली आहे ही मागणी मान्य न झाल्यास कल्याण ते नागपूर अशी पायी दिंडी काढण्यात येणार आहे त्यानंतरही सरकारने भूमिका न घेतल्यास काम बंद आंदोलन करण्याची भूमिका संघर्ष कृतीने घेतली आहे अशी माहिती या समितीचे प्रमुख मिलीद खांडेकर यांनी दिली या संघर्ष पेन्शन परिषदेला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर जिल्हा परिषदेच्या सदस्या जयश्री शेळके यांनीही या संघर्ष समितीच्या कार्यक्रमात सहभागी होऊन आपण त्यांच्यासोबत असल्याचं सांगितलं