अभिवादन करुन शिवसेनेने केला वर्धापन दिन साजरा.
बुलडाणा प्रतिनिधी
मराठी माणसांचे हित जोपासण्याचा दृष्टिकोनातून शिवसेना या संघटनेची स्थापना शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी १९ जून १९६६ ला केली. आज शिवसेनेचा वर्धापन दिन आहेत या वर्धापन दिनाचे औचित्य साधून बुलढाणा जिल्हा शिवसेनेच्या वतीने जिल्हा संपर्क कार्यालयांमध्ये हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, हिंदुरुदय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्राला पुष्पमाला अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली आणि शिवसेनेचा वर्धापन दिन साजरा करण्यात आला . कोरोना महामारी मुळे सर्वत्र जनजीवन विस्कळीत झाला आहे आणि संभाव्य तिसऱ्या लाटे संदर्भात महाराष्ट्राचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जनतेला सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे या पार्श्वभूमीवर शिवसेनेचा वर्धापन दिन कोणतीही गर्दी न करता अत्यंत साध्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय बुलढाणा जिल्हा शिवसेना प्रमुख जालींदर बुधवत यांनी घेतला आणि त्यानुसारच जिल्हा संपर्क कार्यालयामध्ये काही मोजक्या शिवसैनिकांच्या उपस्थितीत वर्धापन दिन साजरा करण्यात आला
यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख जालींदर बुधवत तालुका प्रमुख लखन गाडेकर, शिवसेना प्रवक्ते गजानन धांडे, वैद्यकीय आघाडी तालुका प्रमुख डॉ अरुण पोफळे, गोविंद दळवी, गुलाबराव व्यवहारे, शुभम काळवाघे, मधुकर वऱ्हाडे, आकाश मांटे, गजानन वाघ, अक्षय बेलोकर, गजानन शिंदे, गिरीश आडेकर यांची उपस्थिती होते