बुलढाणा शहरातील सरकारी तलावाच्या पाण्यावर जलपर्णी वनस्पती ने अतिक्रमण केल्यामुळे पाण्यात खाली असलेल्या माशांना मात्र ऑक्सिजन मिळत नसल्याने मासे हे मृत्युमुखी पडत आहे
बुलढाणा शहरात पाण्याची व्यवस्था निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून इंग्रजांनी शहरातील विविध भागांमध्ये 7 तलाव बांधले होते त्यापैकी एक तलाव असलेला सरकारी बगीचा जवळील तलाव आजही अस्तित्वात आहे या तलावात मोठ्या प्रमाणात पाणीसाठा आहे या तलावात कोणीतरी अज्ञात इसमाने जलपर्णी ही वनस्पती आणून टाकले ही वनस्पती इतक्या वेगाने वाढली ही संपूर्ण तलावात तिने अतिक्रमण केले आहे पाण्याच्या पृष्ठभागावर सध्या या जलपर्णी वनस्पतीचे आच्छादन असल्यामुळे सर्वत्र हिरवेगार दिसत आहे परंतु या पाण्याखाली अनेक मासे आहेत ही वनस्पती मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे पाण्यातील माशांना ऑक्सिजन मिळत नाहीये ..
ते ऑक्सिजन मिळवण्यासाठी त्यांची धडपड सुरू आहे अनेक मासे हे ऑक्सिजन न मिळाल्यामुळे मृत्युमुखी पडत आहे ही वनस्पती अशीच वाढत राहिली तर या तलावातील जलचर प्राणी नष्ट होण्याची शक्यता आहे तेव्हा हा तलाव ताब्यात असलेल्या कृषी विभागाने ही वनस्पती काढण्याच्या दृष्टिकोनातून तात्काळ उपाय योजना करणे गरजेचे आहे नाहीतर या तलावात असलेले जलचर प्राणी मृत्युमुखी पडण्याची शक्यता नाकारता येत नाही या तलावाच्या सौंदर्यीकरणासाठी शासनाच्या वतीने मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे परंतु कृषी विभागाच्या अक्षम्य दुर्लक्ष त्यामुळे या तलावात व परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहेत याकडे सुद्धा कृषी विभागाने लक्ष देण्याची मगाणी नागरिकांकडून होत आहे