ज्यादा भवाने खताची विक्री करणाऱ्या दुकान चालकाला कृषी अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडले

0
366
  • ज्यादा भवाने खताची विक्री करणाऱ्या दुकान चालकाला कृषी अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडले
  • सिंदखेड राजा तालुक्यातील कृषी केंद्र चालकांवर जादा दराने विक्री करतात काय ? याकडे कृषी विभागांचे भरारी पथक लक्ष ठेवुन होते. मागील एक दोन दिवसापासून तालुका कृषी अधिकारी वसंतराव राठोड व भरारी पथकाकडे तालुक्यातील किनगांव राजा येथील विलास कृषी केंद्र संचालक ज्ञानेश्वर किसन नागरे हे अंकुर सोयाबिन कंपनीचे जे.एस ३३५ या वाणाची जादा भावाने विक्री करत असल्याचा व कच्चे बिल देत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यानुसार तारीख २० जुन रोजी तालुका कृषी अधिकारी वसंतराव राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली भरारी पथकांने सापळा रचुन किनगांव राजा ते सिंदखेड राजा रस्त्यावर असलेल्या कृषी केंद्र चालकांच्या गोडाऊनच्या जवळ उभ्या असलेल्या आयशर क्रमांक एम.एच.१२ एच.डी.४११२ मधुन विक्री केली जात असल्याची आढळून आले. सदरच्या ठिकाणी उपस्थिती असलेले शेतकरी विठ्ठल दायमा यांच्याकडून पथकाने कच्ची पावती हस्तगत केली. शेतकऱ्यांने ३ बॅग घेतल्या होत्या, कच्च्या बिलावरती प्रतिबॅग ४३०० रुपयांनी विक्री करत असल्याचे आढळून आहे. त्यानंतर पथकाने आयशरची झाडाझडती घेतली.आयशर अंकुर सोयाबीनच्या १८ बॅग आढळून आल्या. त्यानंतर भरारी पथकाकडून पंचनामा करण्यात आला. सद्या शेतकरीकडून बियाणे फेरणीचे काम सुरू असल्याने भरारी पथकाकडून उपस्थित शेतकऱ्यांना शासकीय दराने व पक्के बिल देऊन अंकुर बियाणाची वाटप करण्यात आली.कृषी विभागाच्या भरारी पथकात पंचायत समिती कृषी अधिकारी के.एस. ठोंबरे मंडळ कृषी अधिकारी जी.ए.सावंत , मंडळ कृषी अधिकारी जी.आर.बोरे , कृषी सहाय्यक एस पी घुगे , पोलीस कर्मचारी राजु दराडे यांनी कारवाई केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here