पिकविम्याची भरपाई द्या; अन्यथा मंत्र्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही– माजी आमदार विजयराज शिंदे

0
147
  1. पिकविम्याची भरपाई द्या; अन्यथा मंत्र्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही– माजी आमदार विजयराज शिंदे

बुलडाणा:- राज्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काची पिक विम्याची नुकसान भरपाई ची रक्कम मिळावी या प्रमुख मागणी सह पीककर्ज,कर्ज माफी ई समस्या सोडवण्यासाठी आज भाजपा किसान मोर्च्या च्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय समोर भाजपा नेते मा.आमदार विजयराज शिंदे यांच्या नेतृत्वात धरणे आंदोलन करण्यात आले.

यावेळी किसान मोर्च्यांचे प्रदेश सचिव दीपक वारे, भाजपा तालुकाध्यक्ष सुनील देशमुख,
किसान मोर्च्यांचे तालुकाध्यक्ष सुभाष जगताप यांच्या उपस्थितीत सरकार विरोधी घोषणाबाजी करून शेतकरी विरोधी महाविकास आघाडी सरकार विरोधी घोषणाबाजी करून निषेध व्यक्त केला.

किसान मोर्च्याच्या वतीने वारंवार पाठपुरावा करून देखील पिक विम्याची भरपाई देण्यास कंपन्या टाळाटाळ करीत आहे. राज्यातील शेतकऱ्यांच्या जिवावर करोडो रुपयांची नफेखोरी करून पिक विमा कंपन्या शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसत आहे अश्या मुजोर पिक विमा कंपन्यांवर गुन्हे दाखल करून शेतकऱ्यांना तात्काळ विमा भरपाई द्या,अन्यथा राज्यातील मंत्र्याना रस्त्यावर फिरू देणार नसल्याचा इशारा माजी आमदार विजयराज शिंदे यावेळी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना दिला.
निवेदनात नमूद आहे की, संपूर्ण राज्य भरात शेतकऱ्यांच्या जिवावर पिक विमा कंपन्या कृषि विभागाच्या अधिकाऱ्यांना हाताशा घेऊन करोडा रूपयांची नफेखोरी करत आहे. नुकसान भरपाई देतानाच्या जाचक अटी रद्द करून ग्रामपातळी वरील पंचनामे प्रमाणभूत मानून शेतकऱ्यांना पिक विम्याचा लाभ मिळवून द्यावा व नैसर्गिक आपत्ति व्यवस्थापन कायदा 2005 मधील तरतूदींचा भंग करून शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या पिक विमा कंपन्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी यापूर्वी भाजपा किसान मोर्च्याच्या वतीने वारंवार लेखी निवेदनाद्वारे लावून धरण्यात आली आहे.
पिक विम्या सोबतच पिककर्जाच्या समस्यांनी शेतकऱ्यांना हवालदिल केले आहे.पेरणीस सुरवात होऊन देखील पिक कर्जाचे उदिष्ठ पर्यंत पूर्ण न झाल्याने शेतकऱ्यांवर सावकारीची वेळ आली आहे. पिक कर्ज देण्याबाबत बँकांचे धोरण उदासीन असून करोडो रूपये मूल्य असलेल्या शेत जमिनीवर बँका शुल्लक रकमेचे कर्ज देण्यास टाळाटाळ करत आहे. शेतकऱ्यांच्या जुन्या कर्जाचे तत्त्काळ पुनर्गठन करून शेतकऱ्यांना पिक कर्ज उपलब्ध करून देण्याची गरज आहे पूर्णगठणाची प्रक्रिया ही अत्यंत संथ गतिने सुरु आहे.अनेक शेतकऱ्यांची नावे कर्ज माफित नावे येऊन त्यांना अद्याप पर्यंत कर्जमाफी झालेली नाही अश्याही शेतकरयांना बँका नवीन पिक कर्ज देत नाहीये. शासनाने कर्ज माफी साठी दोन लाख रूपयांपर्यंतच कर्ज माफी करण्याची अट घेतल्याने बरेच शेतकरी कर्ज माफी पासून वंचित आहेत.त्यामुळे ही मर्यादा वाढविन्याची गरज आहे. पिक कर्जाचे नुतनीकरण करतांना बँका जास्त व्याजदर,विमा,प्रोसेसिंग फि ई च्या नावावर अतिरिक्त शुल्क आकारत आहे.पिक कर्जाची परतफेड नियमित करणाऱ्या शेतकर्यांना जाहीर केल्या प्रमाणे ५०००० रु प्रोत्साहनपर रक्कन अद्याप पर्यंत मिळालेली नाही .या अनेक समस्यांनी शेतकरी त्रस्त झालेले असून वारंवार पाठपुरावा करून सुद्धा शासन मात्र या समस्यां कड़े दुर्लक्ष करीत आहे.
त्यामुळे या समस्यांकड़े राज्यसरकार व प्रशासन यांचे लक्ष वेधण्यासाठी आता भारतीय जनता पार्टी बुलडाणा तालुक्याच्या वतीने धरणे आंदोलन करीत आहोत या मागण्याची तत्काळ दाखल न घेतल्यास भविष्यात तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात नमूद आहे.

यावेळी सदर धरणे आंदोलनात महिला मोर्च्या जिल्हाध्यक्ष सिंधुताई खेडेकर,महिला सरचिटणीस अल्काताई पाठक,मायाताई पदमने,महिला शहर प्रमुख वर्षा पाथरकर, सौ उषाताई पवार,माजी नगराध्यक्ष विठ्ठलराव येवले,तालुका सरचिटणीस अर्जुन दांडगे,दत्ता पाटील,सखाराम नरोटे, बाबुराव नरोटे,डॉ. राजेश्वर उबरहंडे,भगवान एकडे, नगरसेवक अरविंद होंडे,मंदार बाहेकर,विनायक भाग्यवंत,
अंकुश भालेराव,ईश्वर चंदेल,
आनंद झोटे, रशीद शेख,योगेश नरोटे,पांडुरंग पाटील,एकनाथ काकड, बंडू घुगे,गणेश देहाडराय,भुजंगराव सावळे,समाधान मोहिते,भारत गव्हाणे,अशोक बाहेकर,, कुलदीप पवार,संजय जुंबंड, आनंदा डुकरे,प्रवीण गाडेकर,यश तायडे,बाळू ठाकरे यांसह शेकडो भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here