वडाचे झाड लावून स्मार्ट ग्राम शेलगाव बाजारच्या सरपंचांनी केली अनोख्या पद्धतीने वट पौर्णिमा साजरी
स्मार्ट ग्राम शेलगांव बाजार* येथे आज असणार्या *वटपौर्णिमा* व्रतादरम्यान विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या ऊत्तम आरोग्य,ऐश्वर्य,दीर्घायुष्य प्राप्त व्हावे म्हणुन ज्या वडाच्या झाडाची पुजा करतात अशा त्या निसर्गतःच दीर्घायुषी असणार्या वृक्षाचे संवर्धन आणी जतन व्हावे व पवित्र मानल्या जाणार्या वृक्षाची सहसा तोड होत नाही अशा हेतुने सरपंचा साै.सरलाताई अमित खर्चे यांनी आज वटपौर्णिमा चे दिवशी ग्रामपंचायत चे मोकळ्या परिसरात नविन वडाच्या झाडाचे वृक्षारोपन* करुन त्याची पुजा केली.ह्यानित्ताने त्यांनी एक आगळा वेगळा आदर्श घडविला.
पर्यावरणशास्त्राच्या दृष्टिने वडाचे झाडाचे महत्त्व विशेष असल्याने त्याच्या विषयी कृतज्ञता व्यक्त करणे हा पण पुजेचा एक हेतुच आहे ह्याकरीता सुद्धा आम्ही हा एक ऊपक्रम राबविला.असे त्यांनी सांगीतले वृक्षारोपन करते वेळी सरपंचा साै.सरलाताई अमित खर्चे यांचे सह ऊपसरपंच,सर्व ग्रा.पं.सदस्य,संगणक परिचारिका,ग्रा.पं.कर्मचारी व गावातील महिला ऊपस्थीत होत्या
Home आपला जिल्हा वडाचे झाड लावून स्मार्ट ग्राम शेलगाव बाजारच्या सरपंचांनी केली अनोख्या पद्धतीने वट...