*एका रुग्णाला १४ रेमडीसीवीर इंजेक्शन देणाऱ्या खामगाव येथील लाईफ लाईन हॉस्पीटलला सील करण्याचे व पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे जिल्हाधिकारी यांनी दिले आदेश
[contact-form][contact-field label=”Name” type=”name” required=”true” /][contact-field label=”Email” type=”email” required=”true” /][contact-field label=”Website” type=”url” /][contact-field label=”Message” type=”textarea” /][/contact-form]
: : कोरोना रुग्णावर उपचार करतांना कोविड प्रोटोकॉलचे उल्लंघन केल्याप्रकरणी बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शहरातील लाईफ लाईन हॉस्पीटलच्या चौकशीचे निर्देश तहसीलदार डॉ. शीतल रसाळ यांनी दिले होते. यासंदर्भात पाच सदस्यीय समितीने दिलेल्या अहवालावरून आज सोमवारी जिल्हाधिकारी एस राममूर्ती यांनी सदर हॉस्पिटल सील व पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिल्याने एकच खळबळ उडाली आहे. हॉस्पिटल कडून कोव्हिडच्या रुग्णाला १४ रेमडीसीव्हर इंजेक्शन दिल्याची डाक्कादायक बाब समोर आली आहे.
बुलडाणा खामगाव येथील लाईफ लाईन हॉस्पीटलमध्ये कोविड-१९ रूग्ण तपासणीसाठी जिल्हा शल्य चिकित्सक बुलडाणा यांची परवानगी घेतलेली नसतानाही रूग्णालयात कोविड रूग्णांना भरती करून त्यांच्यावर उपचार केले जात असल्याची तक्रार प्रशासनाकडे करण्यात आली होती. तक्रारीवरून तहसीलदार शीतल रसाळ यांनी खामगाव येथील जिल्हा सामान्य रुग्ग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक यांना यांना या हॉस्पीटलची तात्काळ चौकशी समिती स्थापन करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार चौकशी करण्यात आल्यानंतर सदर अहवाल जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर करण्यात आले होते. सदर अहवालात अनेक गंभीर बाबी उघडकीस आल्या असून यामध्ये सर्वाधिक गंभीर बाब म्हणजे एका कोव्हिडच्या रुग्णाला १४ रेमडीसीव्हर इंजेक्शन दिल्याची समोर आले आहे. यावरून आज जिल्हाधिकारी एस राममूर्ती यांनी सदर हॉस्पिटल सील करण्यात यावे आणि रुग्णालय प्रशासनाच्या विरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहे. या आदेशामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली.
*Yuwaraj wagh buldana*