0
316

चांदतारा असलेत्या बोकडला  लाखोची मागणी

सिंदखेडराजा

बकरी ईदच्या दिवशी मुस्लीम बांधव बोकडाची कुर्बानी देतात. त्यामुळे बोकडांना मोठी मागणी असते. सिंदखेडराजा तालुक्यात असाच एक बोकड आहे, ज्याला लाखोंची किंमत आहे. एरवी पाच, 10 ते 20 हजार रुपयांना विकलं जाणारं बोकड लाखांच्या घरात जाण्याचं खास कारण आहे. हा बोकड साधासुद्धा नाही. या बोकडाच्या डोक्यावर मुस्लीम धर्मियांची अपार श्रद्धा असलेले चाँद-तारा आहे.त्यामुळे हा बोकड पाहण्यासाठी अनेक जण येत असून सदर बोकडाला बकरी ईद च्या पार्श्वभूमीवर 3 लाख रुपयाला मागून गेला आहे तर सदर बोकड्याच्या मालकाने 5 लाख पेक्षा जो जास्त किंमत देईल त्याला विकणार असल्याचा मानस व्यक्त केला आहे
तब्बल 12 लाखांपर्यंत बोली, लखपती बोकडामुळे शेतकऱ्याची कर्जमुक्ती
सिंदखेड राजा तालुक्यातील लिंगा देवखेड येथील या गावचे महादेव काकडे यांचा बकरी पालन हा व्यवसाय त्यांच्याकडे 20 बकऱ्या असून त्यापैकी एक बकरीने 20 महिन्यांपूर्वी एका गोंडस अश्या बोकड्याला जन्म दिला मात्र जन्मापासून काळ्या रंगाचा आणि त्याच्या डोक्यावर पांढरा शुभ्र चांद तारा असल्याने त्या बोकड्याचा लळा लागला त्यामुळे त्याचे नाव चंद्रेश्वर ठेवले आहे या बोकडामुळे काकडे कुटुंबाच नशीब फळफळलंय. त्यांनी स्वप्नातही विचार केला नसेल एवढ्या किंमतीला या बोकडाची मागणी आहे.चन्द्रेश्वर खऱ्या अर्थाने नावाप्रमाणेच चाँद आहे.. रंगाने काळं असलेल्या बोकडाचं वजन 53 किलो आहे. याच्या डोक्यावर चाँद आहे, तर दोन शिंगांमध्ये तारा आहे. मुस्लिम समाजाचा सण बकरी ईद येत्या 21 तारखेला असल्यामुळे हा बोकड विकणार आहे या बोकडाच्या डोक्यावर चांद तारा आहे मुस्लिम बांधवांच्या दृष्टीने चांद तारा असणे हे खूप पवित्र आहे त्यामुळे या चंद्रेश्वर च्या डोक्यावर चांद तारा असल्याने या ला बघण्यासाठी मुस्लिम बांधव आणि व्यापारी लिंगा देव खेड येथे पाहण्यासाठी येत आहेत दरम्यान जालना आणि औरंगाबाद येथील व्यापाऱ्यांनी या बोकड याला आतापर्यंत तीन लाख रुपये किंमतीपर्यंत मागणी केली आहे मात्र हा बोकड्या पाच लाख रुपये किमतीचापेक्षा कमी किमतीत विकायची नसल्याचे महादेव काकडे यांनी सांगितले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here