- पोलीसांचे सामाजिक कार्यातील योगदान समाजासाठी प्रेरणादायी – ज्ञानेश्वर देशमाने
सिंदखेड राजा
जनतेच्या रक्षणासाठी अहोरात्र खडा पहारा देतानाच सामाजिक कार्यातील पोलीसांचे योगदान समाजासाठी प्रेरणादायी असून साखरखेर्डा पोलीस स्टेशन अभिनंदननास पात्र असल्याचे मत बुलडाणा अर्बन मेहेकर विभागाचे विभागीय व्यवस्थापक ज्ञानेश्वर देशमाने यांनी व्यक्त केले.
दिनांक 11 जुलै रोजी साखरखेर्डा पोलिस ठाण्यात ठाणेदार जितेंद्र आडोळे यांच्या वाढदिवसानिमित्त पोलीस मित्र मंडळाच्या वतीने ग्रंथ तुला करण्यात आली होती सदर ग्रंथ सात सार्वजनिक वाचनालयांना भेट देण्यात आले.असून या वाढदिवसानिमित आयोजित रक्तदान शिबीरात सहभागी रक्तदात्यांना प्रशस्तीपत् वितरण करण्यात आले यावेली आयोजित समारंभात देशमाने बोलत होते.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बुलडाणा अर्बनचे संचालक किशोर महाजन, ठाणेदार जितेंद्र आडोळे, ओमप्रकाश अग्रवाल.हे होते.
यावेळी ज्ञानगंगा स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन केंद्र साखरखेर्डा, सार्वजनिक वाचनालय मलकापूर पांग्रा,
पलसिध्द अभ्यासिका साखरखेर्डा, टायगर ग्रुप साखरखेर्डा, नवजीवन वाचनालय
, शिवम अभ्यासिका साखरखेर्डा, अनिकेत सैनिक स्कूल
यांना एक हजार ग्रंथ मान्यवरांच्या हस्ते वितरीत करण्यात आले तर ठाणेदार आडोळे यांच्या वाढदिवसानिमित्त शासकीय रक्तपेढीत रक्तदान करणारे रक्तदाते श्रीकृष्ण खरात, अशोक काशिकर, अमोल साळवे, संदिप निकाळजे प्रवीण देशमुख , सुनिल वायाळ, भागवत धुड, निलेश शिंगणे, कपिश नंदकिशोर काशपाक, ओम तिवारी, अमोल अवचार
, निलेश इंगळे, अनिल वाघ, रवी खरात, राजेश मापारी, सोमेश्वर इंगळे, आदित्य तिवारी, संदिप इंगळे, सर्जराव मंडळकर, आकाश तळेकर, ठाणेदार जितेंद्र आडोळे, आदींना मान्यवरांच्या हस्ते यथोचित सत्कार करण्यात आला.