*मशाल पेटवून भाजपाला दिला चाले जाव चा नारा*
खामगाव ( प्रतिनिधी )
:९ ऑगस्ट या क्रांती दिनानिमित्त भारतीय स्वातंत्र्य संग्रामात त्याग, समर्पणाची परिसीमा करणाऱ्या क्रांतिकारी, स्वातंत्र्यसैनिक यांच्यासह प्राणांची आहुती देणाऱ्या वीरांना खामगावातील गांधी भाजत अभिवादन करण्यात आले. तसेच कोरोना विषाणू सह जुलमी भाजपा सरकारला हद्दपार करण्याची प्रतिज्ञा यावेळी घेण्यात आली.
: मुंबईतील गवालिया टँकवर ‘करेंगे या मरेंगे’ अशी प्रतिज्ञा घेऊन ब्रिटीशांना ‘चले जाव..! भारत छोडो !’ असा निकराचा इशारा देण्यात आला. क्रांतीच्या वणव्यातून स्वातंत्र्याची पहाट उगवली. या संग्रामात त्याग, समर्पणाची परिसीमा करणाऱ्या क्रांतिकारी, स्वातंत्र्यसैनिक यांच्यासह प्राणांची आहुती देणाऱ्या वीरांना विनम्र अभिवादन करण्यासाठी बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथे माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांच्या अध्यक्षतेखाली मशाल पेटवून आणि मेणबत्या लावून अभिवादन करण्यात आले. तर यावेळी शेतकऱ्यांची कर्दनकाळ आणि सर्वसामान्यांसाठी राक्षसरूपी ठरलेल्या जुलमी भाजपा सरकारला हद्दपार करण्याची प्रतिज्ञा घेऊन चाले जावं चा नारा यावेळी देण्यात आल्याची माहिती माजी आमदार सानंदा यांनी दिली.