सापांना निसर्गाच्या सानिध्यात सोडून साजरा केला नागपंचमीचा उसव
नागपंचमीच औचित्य साधुन बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर येथील सर्पमैत्रीन वानिता बोराड़े यांनी पकडलेल्या विषारी व बिनविषारी सापांना नैसर्गिक अधिवासात सोडुन देऊन नागपंचमीचा सर्पोत्सव साजरा केला…
सर्पमैत्रीण वनिता बोराडे घ्या गेल्या 25 वर्षापासून सातत्याने सापांना पकडून त्यांना जीवदान देण्याचं काम करत आहे आतापर्यंत त्यांनी ऐक्कावन्न हजार सापांना लोक वस्तीतून पकडून जंगलात सोडून देत सापांचा व लोकांचा जिव वाचवण्याचे काम केला आहे. सार्पसंदर्भात लोकांच्या मनात असलेल्या गैरसमजुती दूर करून विषारी आणि बिनविषारी साप कोणते या संदर्भात जनजागृती करण्याचे काम त्या सातत्याने करत आहे नागपंचमीचा औचित्य साधून त्यांनी आज वन विभागाच्या साह्याने घाटबोरी वनपरिक्षेत्र मध्ये सापांना सोडून दिले