*बॅकेचे एटी एम मशीन फोडून 56 लाखांची रोकड चोरणाऱ्या 2 परप्रांतीय गुन्हेगारांना बुलढाणा पोलिसांनी राजस्थान मधून केली अटक.*
*बुलढाणा पोलिसांना मोठं यश , अनेक गुन्ह्याचा तपास लागण्याची शक्यता.*
बुलडाणा जिल्ह्यात 30 जूनच्या रात्री गॅस कटरच्या सहायाने खामगाव व चिखली तालुक्यातील तीन बँकेचे ए टी एम मशीन फोडून अज्ञात आरोपीनी जवळपास 56 लाख रुपयांची रोकड लंपास केली होती . या गुन्ह्याच्या शोधासाठी बुलढाणा पोलिसांनी पाच पथके तयार करून गुन्ह्याचा सखोल शोध घेऊन राजस्थानातून दोघांना अटक केली आहे , या आरोपीनी या आधीही काही ठिकानी अशाच प्रकारे एटीएम मशिन्स फोडून चोरी केल्याची माहिती पोलीस अधीक्षक अरविंद चावरीया यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली आहे. अशा प्रकरच्या गुन्ह्याचा छडा लावण्यात बुलढाणा पोलिसांना यश आले असून राजस्थानच्या अलवर जिल्ह्यातून या दोघे सराईत गुन्हेगारांना अटक करण्यात आली आहे , न्यायालयाने त्यांना आठ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या आरोपींनी जवळून पंधरा लाखाची रोकड जप्त करण्यात आले असून इतर पैसे त्यांनी काही बँकेमध्ये वर्गीकृत केले आहेत ते सहा अकाउंट सीज करण्यात आल्याची माहितीही जिल्हा पोलीस अधीक्षक अरविद चावरीया यांनी पत्रकार परिषदेत दिली या आरोपींनी राज्यात इतर ठिकाणी अशाच प्रकारच्या चोरी केल्याची शक्यता वार्तविण्यात आली आहे …
बाईट – अरविंद चावरीया , पोलीस अधीक्षक बुलढाणा